Join us

सायली संजीव घेऊन आलीय लग्नाचा रंगतदार ‘बस्ता’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 18:51 IST

सायली संजीवचा मुंडावळ्या बांधलेल्या फोटोची सोशल मीडियावर होतेय चर्चा

लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते. आता हा रंगतदार ‘बस्ता’ चित्रपटाच्या माध्यमातून २९ जानेवारीला प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. 

सायली संजीवने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, लग्नसराई सुरु झालीए, तुमचा #Basta बांधून झाला की नाही? नसेल झाला तर 'फिकर नॉट', @ZeePlexOfficial 29 जानेवारीपासून घेऊन येतोय #Basta फक्त 99/- रुपयांत.

श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत, सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी ‘बस्ता’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, सुरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील अशी उत्तम स्टारकास्ट आहे.

मुंडावळ्या बांधलेली, चेहऱ्यावर आनंद असलेली सायली संजीव या पोस्टरवर दिसत आहे. अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे. त्यामुळेच हा चित्रपट नक्कीच मनोरंजक आणि वेगळी गोष्ट सांगणारा असेल यात शंका नाही.

या निमित्ताने दिग्दर्शक तानाजी घाडगे म्हणाले, "बस्ता हा एका शेतकरी वडील माणसाचा एक अतिशय भावनिक प्रवास आहे ज्याला आपल्या मुलीचे सुखाने लग्न झालेले पहायचे आहे. त्यात आनंदाचे आणि हळवे क्षण आहेत. प्रत्येक पात्राला सुंदर भावनात्मक ग्राफ लाभलाय. मला झीप्लेक्ससारखा प्लॅटफॉर्म मिळाल्याचा मला आनंद झाला आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा हा उत्तम मार्ग आहे."

झीप्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरिक पटेल म्हणाले, "बस्ता ही एक अतिशय संबंधित कथा आहे. आम्ही हा चित्रपट झीप्लेक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणू शकलो याचा आनंद आहे, त्यांना हा चित्रपट आवडेल अशी अशा बाळगतो."‘बस्ता’ २९ जानेवारीला झीप्लेक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

टॅग्स :सायली संजीव