Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चे हुबेहूब पोट्रेट बघून हरकून गेला सौरभ गोखले, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 17:28 IST

‘आवाज’ मालिकेत संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता सौरभ गोखले सध्या भलताच खुश आहे. आता तुम्ही म्हणाल की, ...

‘आवाज’ मालिकेत संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता सौरभ गोखले सध्या भलताच खुश आहे. आता तुम्ही म्हणाल की, सौरभला एखादा मोठा प्रोजेक्ट मिळाला असेल? परंतु त्याच्या आनंदाचे कारण आगामी प्रोजेक्ट नसून ‘पोट्रेट’ आहे. होय, सौरभला एका कार्यक्रमात त्याची हुबेहूब प्रतिमा असलेले पोट्रेट (पेंटिंग) गिफ्ट करण्यात आले असून, ते बघून त्याला खूपच आनंद झाला आहे. सौरभने हे पोट्रेट सोशल अकाउंटवर शेअर केले असून, त्याने आर्टिस्टचे तोंडभरून कौतुकही केले आहे. ‘आवाज’ आणि ‘तू माझा सांगती’ या मालिकांमध्ये संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारून सौरभने प्रेक्षकांची मने जिंकली. शिवाय प्रेक्षकांच्या मनात त्याची एक वेगळीच प्रतिमा निर्माण झाली असून, तो कायम ठेवण्याचा आजही प्रयत्न करताना दिसतो. सौरभ त्याच्या करिअरबरोबरच सामाजिक जीवनातही नेहमीच अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो शक्य होईल तेव्हा विविध कार्यक्रमांमध्ये आवर्जून उपस्थित राहतो. अशाच एका रंगोळी प्रदर्शनात त्याला आमंत्रित करण्यात आले होते. त्याठिकाणी त्याची प्रतिमा असलेले एक पोट्रेट त्याला भेट म्हणून देण्यात आले. पोट्रेटमध्ये स्वत:ची हुबेहूब प्रतिमा बघून त्याला एवढा आनंद झाला की, त्याने हे पोट्रेट फेसबुकवर त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केले. त्याचबरोबर त्याने आर्टिस्टचेही कौतुक केले. फेटा बांधलेल्या अंदाजातील एवढ्या सुरेख पद्धतीने स्वत:चे पोट्रेट साकारणाºया आर्टिस्टला त्याने ‘हॅट्स आॅफ’ म्हणून दाद दिली. या पोट्रेटला त्याच्या चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, सौरभ सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त असून, छोट्या पडद्यावर आपला करिष्मा दाखविण्यास तो सज्ज आहे.