Join us  

हळद लागली..! 'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम जुईली जोगळेकरच्या हळदी सेरेमनची फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:32 PM

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत.  ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम रोहित राऊत (Rohit Raut ) लवकरच गायिका जुईली जोगळेकरसोबत ( Juilee Joglekar) विवाह बंधनात अडकणार आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत.  ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम रोहित राऊत (Rohit Raut ) लवकरच गायिका जुईली जोगळेकरसोबत ( Juilee Joglekar) विवाह बंधनात अडकणार आहे. नुकताच जुईलीला हळद लागल्याचा फोटो समोर आला आहे. राजेश्री मराठीने जुईलाचा हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटोत जुईलीच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसतो आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. दोघांच्या त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. त्यानंतर ते कधी लग्नबंधनात अडकणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. 23 जानेवारीला दोघे लग्नाच्या बेडीत अडकू शकतात. 

सोशल मीडियावर दिली होती प्रेमाची कबुली २००९ साली झी मराठीवर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा पहिला सीझन आला होता. रोहित राऊत या पहिल्या पवार्चा विजेता ठरला होता. त्यानंतर रोहितने गायक म्हणून सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर ही देखील स्पर्धक म्हणून आली होती. तेव्हापासून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले आणि मग प्रेमात. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली आहे.

टॅग्स :रोहित राऊतसेलिब्रिटी