Join us  

PICS : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायकाचं लवकरच शुभमंगल सावधान! नुकतंच झालं केळवण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 2:20 PM

Rohit Raut and Juilee Joglekar : नुकताच अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा प्रतीक शाह सोबत साखरपुडा पार पडला. आता आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकणार आहे.

मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. मराठी चित्रपटसृष्टीही याला अपवाद नाही. नुकताचअभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा प्रतीक शाह सोबत साखरपुडा पार पडला. आता आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकणार आहे. होय, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम रोहित राऊत ( Rohit Raut )लवकरच लग्नबांधनात अडकणार आहे. गर्लफ्रेन्ड जुईली जोगळेकरसोबत (  Juilee Joglekar) लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच दोघांचा केळवणाचा कार्यक्रम झाला.

होय, रोहित व जुईलीची मैत्रित रोहिता चव्हाण हिने या दोघांसाठी खास केळवणाचा बेत केला होता. याचे फोटो तिने इन्स्टास्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोंवरून रोहित व जुईली लवकरच लग्न करणार, असं मानलं जातेय.

2009 साली झी मराठीवर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा पहिला सिजन झाला होता. रोहित राऊत या पहिल्या पवार्चा विजेता ठरला होता. यानंतर रोहितने गायक म्हणून मराठी सृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर ही देखील स्पर्धक बनून आली होती. तेव्हापासून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख होती. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले आणि मग प्रेमात. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली देखील दिली. दोघंही एकमेकांसोबत मजा मस्ती करणारे धम्माल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

जुईली जोगळेकर ही मूळची पुण्याची पण सध्या ती मुंबईत वास्तव्यास आहे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमधून तिने पदवीचे शिक्षण घेतले आहे. ‘सारेगमप सूर नव्या युगाचा’ या झी मराठीवरील शोमध्ये ती सहभागी झाली होती आणि या शोची विजेती देखील ठरली होती. या शोमुळे जुईली प्रसिद्धीच्या झोतात आली. झी युवा वरील ‘संगीत सम्राट सिजन 2’ या शोमध्ये जुईली ‘कोकण कन्या टीम’ची कॅप्टन बनली होती. कोकण कन्या या टीमच्या स्पर्धकानेच विजेतेपद पटकावले होते. 

 रोहित राऊतने केवळ मराठी सृष्टीतच नाही तर हिंदी रिअ‍ॅलिटी शोमधूनही आपल्या गाण्याची झलक दाखवून दिली आहे.  ‘इंडियन आयडॉल’मध्येही तो झळकला होता.  वजनदार, अवताराची गोष्ट,  प्यार वाली लव्ह स्टोरी, कान्हा, वन वे तिकिट,बे दुणे साडेचार, का रे दुरावा आदी चित्रपट आणि काही मालिकांसाठी त्याने गाणी गायली आहेत.

टॅग्स :रोहित राऊत