संतोष जुवेकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे. संतोषचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावरुन तो चाहत्यांना अपडेट्सही देत असतो. संतोषने नुकतंच त्याच्या शूटिंग दरम्यानचा अनुभव शेअर केला आहे.
संतोषने त्याच्या आगामी सिनेमात एका छोट्या बाळासोबत काम केलं. याचा अनुभव शेअर करत त्याने पालक आणि सिनेमाच्या टीमसाठीही खास संदेश दिला आहे. शूटिंगसाठी सेटवर आलेल्या बाळांची सिनेमाच्या टीमने काळजी घेण्याबरोबरच आईवडिलांनीही जाणीवपूर्वक या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, असं त्याने म्हटलं आहे.
संतोष जुवेकरची पोस्ट
काल आमच्या shooting सेटवर एक Santa आला होता छोटासा... त्याने काम पण केलंय सिनेमात आमच्या ❤
मी माझ्या पूर्ण आयुष्यात पहिल्यांदा इतक्या छोट्याशा बाळासोबत सिनेमात काम केलंय. मस्त धम्माल केली आम्ही...फारच गोड आणि गोंडस बाळ होतं. एकदम हसरं देवसारखंच अगदी ❤ ह्या सिनेमात काम करणाऱ्या ह्या आशा छोट्या छोट्या बाळांच्या आई वडिलांना आणि तो सिनेमा बनवणाऱ्या सर्व teamla एक विनंती...
plzzzzz🙏🏼आपल्या पिल्लांची व्यवस्थित काळजी घेत जा. त्यांची खाण्यापिण्याची, स्वच्छतेची सगळीच आणि filmच्या team ला सुद्धा हीच विनंती... बाळ लहान असतात. त्यांची त्वचा नाजूक असते, अगदीच कोवळा जीव असतो तो...मोठाले आणि खूप harsh lights पासून त्यांना लांब ठेवा. फार makeup वैगरे नका करत जाऊ... मुळातच ती निरागस,खूप गोड, सुंदर असतात.
मला खात्री आहे तुम्ही काळजी घेतच असाल तरी पण मला वाटलं म्हणून सांगितलं 😊 माफ करा.
संतोषच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, संतोषने 'मोरया', 'झेंडा', 'एक तारा', 'रेगे' , '३६ गुण', 'डेट भेट', 'रावरंभा' अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'रानटी' सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.