राजनची भूमिका साकारणार संतोष जुवेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 14:33 IST
priyanka londhe अंडरवर्ल्डच्या दुनियेवर आजपर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. गुन्हेगारी विश्व ...
राजनची भूमिका साकारणार संतोष जुवेकर
priyanka londhe अंडरवर्ल्डच्या दुनियेवर आजपर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. गुन्हेगारी विश्व उलगडण्याचे धाडस बॉलिवूडवाल्यांनी केले खरे परंतू आता मराठी चित्रपटसृष्टीत देखील लवकरच राजन नावाचा अंडरवर्ल्डच्या दुनियेशी निगडीत चित्रपट येत आहे. हा चित्रपट छोटा राजनच्या आयुष्यावर आधारीत असल्याचे बोलले जातेय. तर चित्रपटातील बरेचसे भाग हे राजनच्या आयुष्याशी मिळते-जुळते असल्याचे कळतेय. राजनची भूमिका अभिनेता संतोष जुवेकर साकारणार असून त्याने या भूमिकेविषयी लोकमत सीएनएक्सशी साधलेला हा संवाद खास तुमच्यासाठी.... या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?-: राजन नावाच्या एका मुलाची ही कथा आहे. सर्वसामान्य घरातून आलेला हा मुलगा नंतर कसा मुंबईचा डॉन हातो हे यामध्ये दाखविण्यात आले आहे. लोकांमध्ये सध्या असा गैरसमज आहे की ही छोटा राजनच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे. परंतू तसे बिलकुलच नाहीये. या चित्रपटातील काही प्रसंग, आणि घटना या त्यांच्याशी मिळत्या-जुळत्या असतील. छोटा राजनवर चित्रपट करायचे म्हणजे त्यासाठी बºयाच मोठ्या अभ्यासाची गरज आहे. हिंदीमधील सत्या हा चित्रपट जसा आहे तशाच प्रकारचा हा सिनेमा देखील असेल. या भूमिकेसाठी तु काही तयारी केली आहेस का?-: अशाप्रकारची भूमिका साकारायची म्हणजे तुम्हाला त्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. मी देखील या राजनच्या भूमिकेसाठी काही तयारी करीत आहे. यासाठी मी बॉडीबिल्ड करत आहे. तसेच चित्रपटामध्ये अॅक्शन सीन्स असल्याने मी त्यासाठी विशेष ट्रेनिंग घेत आहे. एखादया डॉनची तगडी भूमिका करायची म्हंटल्यावर पडदयावर चांगलेच दिसले पाहिजे. त्यासाठी अतिशय मेहनत घ्यावी लागते. प्रेक्षकांच्या तुमच्याकडून अनेक अपेक्षा देखील असतात. तसेच कथेवर काम सुरु असून मी दिग्दर्शक सांगतील त्याप्रकारे सर्व गोष्टी या भूमिकेसाठी करत आहे.सध्या 'राजन' सिनेमाची चर्चा होतेय, त्यामुळे प्रेक्षक ख-या राजनला तुझ्या भूमिकेत पडद्यावर पाहतील त्यामुळे तुझ्यावर काही दडपण आहे का? -: खर सांगायचे झाले तर मी फक्त माझे काम चांगल्याप्रकारे करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी तो नेहमीच माझ्या प्रत्येक चित्रपटात करतो. प्रत्येकालाच वाटते की आपला सिनेमा यशस्वी व्हावा. प्रेक्षकांना तो आवडवे. हा सिनेमा देखील माझी एक मोठी जबाबदारीच आहे. मी माझ्या कडून चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार. शेवटी काय ते प्रेक्षकच ठरवतील. एखादया डॉनची भूमिका साकारताना मनात कधी भीती वाटते का ?-: कलाकारांचे तर कामच आहे की प्रत्येक भूमिका ही चांगल्याप्रकारे साकारायची. त्यामुळे हे माझे कामच असल्याने मला भीती वाटण्याचे किंवा घाबरण्याचे काहीच कारण नाही. हो पण मला अशी भीती 'झेंडा' चित्रपटाच्यावेळी वाटली होती. परंतू ही राजनची भूमिका साकारताना जर माझ्याकडून काही चुक झाली किंवा कोणाला वाईट वाटले तर त्यासाठी मी आधीच सॉरी म्हणतो. चित्रपटात फक्त अॅक्शनच दिसणार आहे का ?-: हा चित्रपट गुन्हेगारी विश्वावर आधारीत असला तरी यामध्ये सुंदर प्रेमकथेला देखील वाव आहे. एक चांगली लव्हस्टोरी प्रेक्षकांना यामध्ये दिसणार आहे. तसेच एक आयटम साँग देखील असणार आहे. हा चित्रपट फक्त अॅक्शन नाही तर एकदम मसाला आणि एंटरटेनींग आहे. यामध्ये तुम्हाला नवीन अभिनेत्री देखील दिसू शकते.