Join us

तुझी आणि फक्त तुझीच...संस्कृती बालगुडेने शेअर केलेल्या ग्लॅमरस फोटोशूट खिळल्या साऱ्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 15:50 IST

सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती (Sanskruti Balgude) सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.

विविध सिनेमात संस्कृती (Sanskruti Balgude)ने भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. वेगवेगळ्या विषयांवर सकारात्मक विचार मांडताना दिसते. सोशल मीडियावर संस्कृतीचे प्रचंड चाहते आहेत.दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत आहे. तिने शेअर केलेल्या काही फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. संस्कृतीने तिचे ब्लॅक टॉप आणि स्कर्टमधले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. संस्कृतीचं हे फोटोशूट थ्रोबॅक असल्याचं तिने तिच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या फोटोंमध्ये संस्कृतीच्या अदा बघून चाहते घायाळ झाले आहेत. त्यानी या फोटोंवर स्टनिंग ब्युटीफुल, गॉर्जिअस अशा कमेंट केल्या आहेत. 

 संस्कृतीने पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अभिनेत्री संस्कृती बालगुडेकडे आहे. तिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत. अनेक सिनेमे न स्वीकारता सिलेक्टिव्ह राहायला संस्कृतीला आवडते.

टॅग्स :संस्कृती बालगुडेसेलिब्रिटी