Join us
Daily Top 2Weekly Top 5

'वयाच्या चाळीशीत लग्न करताना वडिलांनी विचारलं...' संजय मोनेंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 12:48 IST

माझ्या आईवडिलांची तिने जितकी सेवा केली तितकी मी नाही केली.

मराठी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे संजय मोने (Sanjay Mone) आणि सुकन्या मोने (Sukanya Mone) यांची. ना प्रसिद्धीचा बडेजाव ना कोणता अॅटिट्यूड अगदी साधी सरळ आणि प्रेमळ अशी ही जोडी आहे. नुकतंच या कपलने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी संजय मोनेंनी वयाच्या चाळीशीत लग्न केलं आणि सुकन्या मोने यांनाच का निवडलं याचा किस्सा सांगितला.

'लोकमत फिल्मी'च्या 'लव्हगेम लोचा' या कार्यक्रमात संजय मोने आणि सुकन्या मोने यांनी हजेरी लावली. संजय मोने यांनी त्याच्या वयाच्या चाळीशीत सुकन्या यांच्याशी लग्न केलं होतं. या निर्णयामागचा किस्सा काय असं विचारलं असता ते म्हणाले,'मला वडिलांनी विचारलं होतं का करतोय लग्न. सगळं व्यवस्थित चाललंय तुझं. यात आलं ना सगळं. मग वाटलं की या वयात लग्न करायचं तर अशा मुलीशी करावं लागेल जिला माझ्या आईवडिलांमध्ये स्वत:चे आईवडील दिसले पाहिजेत. बाकी आयुष्यात माझे बरेच अंदाज चुकले पण तो अंदाज मात्र अत्यंत योग्य ठरला. फक्त कॅमेऱ्यासमोर नाही तर प्रामाणिकपणे सांगतो की माझ्या आईवडिलांची तिने जितकी सेवा केली तितकी मी नाही केली. तिने १०० टक्के सेवा केली मी ७०-७५ टक्के केली. माझा निर्णय अचूक होता तिचा माहित नाही.'

संजय मोने आणि सुकन्या कुलकर्णी मोने 1998 साली लग्नबंधनात अडकले. त्यांच्यात तब्बल ९ वर्षांचं अंतर आहे. त्यांना ज्युलिया ही मुलगी आहे. नुकतंच सुकन्या मोने 'बाईपण भारी देवा' सिनेमात दिसल्या. यामधील त्यांचं काम प्रेक्षकांना खूपच आवडलं.

टॅग्स :संजय मोनेसुकन्या कुलकर्णीमराठी अभिनेतालग्न