Join us  

आतापर्यंत न पाहिलेल्या अंदाजात दिसणार संजय जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 6:30 AM

सिनेमॅटोग्राफर ते दिग्दर्शक आणि मग अभिनेता असा प्रवास करणारा संजय जाधव आता एका वेगळ्याच भूमिकेत आपल्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्देगावखेड्यातील उनाडटप्पू विद्यार्थी ते साहसी कबड्डीपटू असा रोमांचकारी प्रवास 'सूरसपाटा'मध्ये'सूर सपाटा'च्या निमित्ताने तब्ब्ल २५ दिग्ग्ज कलावंतांचा ताफा आमने-सामने

सिनेमॅटोग्राफर ते दिग्दर्शक आणि मग अभिनेता असा प्रवास करणारा संजय जाधव आता एका वेगळ्याच भूमिकेत आपल्या भेटीला येणार आहे. लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि प्रस्तुत आणि मंगेशकंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा' या चित्रपटातून पहिल्यांदाच तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

खेळांवर आधारित चित्रपट तसे एकूणच कमी पाहायला मिळतात मराठीत तर त्याहून कवचित. अशातच जयंत लाडे प्रेक्षकांसाठी एक अस्सल मातीतला खेळ कबड्डी रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत. कबड्डीला आज अनन्यसाधारण महत्त्व आले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कबड्डीची दखल घेतली गेलेली आहे. याला अनुसरूनच 'सूर सपाटा'ची कथा मंगेश कंठाळे यांनी बांधली आहे. तर अभिनय जगताप यांचे सुमधूर संगीत या चित्रपटाला लाभले आहे. गावखेड्यातील उनाडटप्पू विद्यार्थी ते साहसी कबड्डीपटू असा रोमांचकारी प्रवास रेखाटणाऱ्या 'सूरसपाटा'मध्ये संजय जाधव एक सरप्राईझ एलिमेंट म्हणून दिसतील. आतापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत या चित्रपटामध्ये साकारलेली कबड्डी प्रशिक्षक शंकर जगदाळेची भूमिका प्रेक्षकांना नक्कीच भावेल अशीच आहे.  किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित 'सूर सपाटा'च्या निमित्ताने तब्ब्ल २५ दिग्ग्ज कलावंतांचा ताफा आमने-सामने येणार असून ह्या गुलदस्त्यातील महत्वाच्या उपेंद्र लिमये आणि संजय जाधव यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी खास उलगडण्यात आल्या आहेत तर इतर कलावंतांची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. अनेक दर्जेदार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीय पुरस्कारविजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका 'सूर सपाटा'मध्ये आपल्याला पहायला मिळतील. पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांचीआहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनीच केले आहे. चित्रपटाचा कॅनव्हास सिनेमॅटोग्राफर विजय मिश्रा यांच्यालेन्समधून चित्रित करण्यात आला आहे.अनेक चित्रपट आणि मालिकांना मार्गदर्शन करणाऱ्या संजय जाधवाचे नेतृत्त्व 'सूर सपाटा'तील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करते हे पाहणे रंजक ठरणार आहे. 'सूर सपाटा' २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

टॅग्स :संजय जाधवसूर सपाटा