Join us
Daily Top 2Weekly Top 5

संग्राम समेळच्या लग्नानंतर पहिली पत्नी आली चर्चेत, सोशल मीडियावर शेअर केला बोल्ड फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 15:32 IST

पल्लवीने शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला ती स्विमिंगपूलच्या कठड्यावर बसलेली दिसत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

ठळक मुद्देपल्लवीने शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला ती स्विमिंगपूलच्या कठड्यावर बसलेली दिसत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तू खूपच हॉट दिसत आहेस असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संग्राम समेळ नुकताच दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. संग्रामच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाले. इचलकरंजीला हा विवाह सोहळा पार पडला. संग्रामचे हे दुसरे लग्न आहे. २०१६ मध्ये संग्रामचे पल्लवी पाटीलसोबत लग्न झाले होते मात्र काही कारणामुळे दोघे वेगळे झाले. पल्लवीने नुकताच तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

पल्लवीने शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला ती स्विमिंगपूलच्या कठड्यावर बसलेली दिसत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तू खूपच हॉट दिसत आहेस असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

'पार्टनर' या एकांकिकेतून पल्लवीला खूप लोकप्रियता मिळाली होती. तसेच रुंजी या मालिकेमुळे पल्लवी घराघरात पोहोचली. तिने बापमाणूस या मालिकेत साकारलेल्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. तसेच ती अग्निहोत्र 2 मध्ये दिसली होती. 

संग्रामने काहीच दिवसांपूर्वी दुसरे लग्न केले असून त्याची पत्नी श्रद्धा फाटक डान्सर आहे. ती डान्सचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धा फाटक संग्रामबद्दल भरभरून बोलली होती. संग्राम खूप काळजी घेतो आणि प्रेमळ असल्याचे तिने सांगितले होते.

टॅग्स :संग्राम समेळपल्लवी पाटील