Join us

संदीप पाठकची वृध्दाश्रमला अनोखी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 15:24 IST

समाजात गरीब, वृध्द, अनाथ अशा अनेक लोकांना मोठया प्रमाणात मदतीचा हात पुढे केला जातो. तसेच कोणी पैसे, कपडे, जागा, ...

समाजात गरीब, वृध्द, अनाथ अशा अनेक लोकांना मोठया प्रमाणात मदतीचा हात पुढे केला जातो. तसेच कोणी पैसे, कपडे, जागा, दप्तर, पुस्तके अशा अनेक मार्गानीं मदतीचा हात पुढे करत असतात. मात्र प्रेक्षकांचा लाडका अभिनेता संदीप पाठक याने वृध्दाश्रमाला मदत म्हणून एक अनोखी भेट देणार आहे. संदीपने मुंबई येथील कै. कमलाकांत भिसे वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवी समारंभानिमित्त आजी-आजोबांसाठी वºहाड निघालंय लंडनला या नाटकाचा खास प्रयोग! ठेवला आहे. याविषयी संदीप लोकमत सीएनएक्सला सांगतो, समाजात कित्येक व्यक्ती कोणत्याना कोणत्या निमित्ताने मदतीचा हात पुढे करत असतात. मात्र मी एक कलाकार म्हणून आजी आजोबांच्या चेहºयावर हास्य आणि आनंद देण्याचा हा प्रयत्न वºहाड निघालंय लंडनला या नाटकाच्या निमित्ताने करणार आहे. एक नातू म्हणून मी त्यांचे मनोरंजन करणार आहे. या वयात त्यांना जो एकटेपणा वाटतो. ती भिती त्यांच्या मनातील काढून टाकणार आहे. यापूर्वी औरंगाबादलादेखील मी आजी आजोबांसाठी नाटकाचे प्रयोग केले आहे. एक कलाकार म्हणून त्यांना आनंदित व नेहमी हसत ठेवण्याचा माझा हा प्ऱयत्न असणार आहे. हे नाटक मी आज संध्याकाळी पाच वाजता सादर करणार आहे. संदीपने यापूर्वी नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. तसेच त्याने चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच त्यांच्या रंगापतंगा या चित्रपटाने नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील यश मिळविले आहे. त्याचप्रमाणे भूताचं हनीमून, टाइमपास २, हरिश्चंद्राची फॅक्टरी असे अनेक चित्रपट केले आहेत. नुकतेचा त्याचा तथास्तु: हा चित्रपट छोटया पडदयावर प्रदर्शित झाला असल्याचे पाहायला मिळाले.