Join us  

मराठी सिनेमे ओटीटीवर का चालत नाही? स्वप्नील जोशीनं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 7:00 AM

‘समांतर 2’ ही  सीरिज प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. हा प्रतिसाद पाहून स्वप्नील सुखावला आहे. पण यासोबत एक खंत शिल्लक आहेच...

ठळक मुद्दे ‘समांतर’ने  प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.  त्यानंतर प्रेक्षक गेलं वर्षभर वेबसीरिजच्या दुस-या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते.

स्वप्नील जोशीची ‘समांतर’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. नुकताच या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला. ओटीटीवर रिलीज झालेली ही  सीरिज प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. हा प्रतिसाद पाहून स्वप्नील सुखावला आहे. पण यासोबत एक खंत शिल्लक आहेच. होय,  मराठी सिनेमे ओटीटीवर चालत नाही, हीच ती खंत. मराठी सिनेमे ओटीटीवर का चालत नाहीत? आता यावर स्वप्नीलनं उत्तर दिलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तो यावर बोलला. मराठी सिनेमे ओटीटीवर फार चालत नाहीत, यामागे वेगवेगळी कारणं असल्याचं तो म्हणाला. तो म्हणाला, ‘ओटीवर मराठी चित्रपट न चालण्यामागं अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एका वाक्यात याचं उत्तर देणं कठीण आहे. चित्रपटाचा दर्जा काय? माध्यमांत त्या चित्रपटाची चर्चा आहे का? प्रेक्षकांना तो पाहायचा का? अशा अनेक गोष्टी असतात. अनेक मराठी सिनेमे जागतिक पातळीवर गाजतात. पण बरेचदा मराठी प्रेक्षक ते पाहण्यास ते उत्सुक नसतात. मराठी सिनेसृष्टीची ही खूप मोठी समस्या आहे. यावर सर्वांनी एकत्र येऊन खरं तर तोडगा शोधायला हवा. अन्यथा जे सुरू आहे, तेच सुरु राहिल.’

 ‘समांतर’ने  प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.  त्यानंतर प्रेक्षक गेलं वर्षभर वेबसीरिजच्या दुस-या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते.  आता  ‘समांतर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वेबसीरिजचा दुसरा सीजनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसत आहे. या दुस-या सीझनमधील स्वप्नील आणि तेजस्विनीच्या इंटिमेट सीनने प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे.  

टॅग्स :स्वप्निल जोशी