Join us  

सलीम खान, मधुर भंडारकर, हेलन, सुचेता भिडे-चाफेकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 11:59 AM

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात  शहिद झालेल्या ४० पेक्षा अधिक सीआरपीएफच्या जवानांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. यंदा मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीत, एक कोटी रुपये दान म्हणून देण्यात येतील.

दरवर्षी दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे  संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना सन्मानित केले जाते. यंदा संगीत आणि कला क्षेत्रातील नामवंत शास्त्रीय नर्तकी श्रीमती सुचेता भिडे-चाफेकर यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना प्रदान करण्यात येईल. भारतीय चित्रपटसृष्टीत महत्वपूर्ण योगदानासाठी  मधुर भंडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देण्यात येईल. हेलन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित करण्यात येईल. साहित्य क्षेत्रात वसंत आबाजी डहाके यांना वागविलासिनी पुरस्कारांनी पुरस्कृत केले जाईल. भद्रकाली प्रॉडक्शनचे 'सोयारे सकाळ' हे नाटक मोहन वाघ पुरस्काराने वर्षातील सर्वोत्तम नाटक म्हणून गौरविण्यात येईल. 

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तालयोगी आश्रमचे पंडित सुरेश तळवळकर यांना आनंदमयी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सीआरपीएफ डायरेक्टर जनरल विजयकुमार यांना गृह मंत्रालयाअंतर्गत भारताच्या जवानांसाठी सामाजिक कार्य करणारी मान्यताप्राप्त संस्था 'भारत के वीर' साठी सम्मानित केले जाईल. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानने या वेळी हा पुरस्कार सोहळा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात  शहिद झालेल्या ४० पेक्षा अधिक सीआरपीएफच्या जवानांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. यंदा मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीत, एक कोटी रुपये दान म्हणून देण्यात येतील.

हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिल, २०१९ रोजी मुंबई येथील षण्मुखानंद हॉल येथे पार पडेल. सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल श्री विजयकुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असतील आणि यावर्षीच्या विजेत्यांना आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील. 

टॅग्स :सलीम खानमधुर भांडारकर हेलन