Join us  

Akash Thosar : “ तिला फक्त…” आकाश ठोसर लग्नासाठी तयार, अट फक्त एकच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 1:51 PM

Akash Thosar : लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे? असा प्रश्न आकाशला विचारण्यात आला. यावर आकाशने हटके उत्तर दिलं.

‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेले आर्ची आणि परश्या गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त चर्चेत आहेत. होय, आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू आणि परश्या ही भूमिका साकारणारा आकाश ठोसर (Akash Thosar) एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अर्थात ही नुसती चर्चा आहे. कारण असं काहीही नसल्याचं आकाश व रिंकूने कधीच स्पष्ट केलं आहे. पण त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही चर्चा मात्र थांबायचं चिन्ह नाहीत.

लवकरच आकाशचा घर, बंदूक, बिरयानी (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा रिलीज होतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आकाश सध्या बिझी आहे. मग काय, जिथे जाईल तिथे आकाशला रिंकूबद्दल, लग्नाबद्दल प्रश्न विचारला जातोय. अलीकडे एका मुलाखतीत आकाशला लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आकाशने हटके उत्तर दिलं. तुला स्वयंपाक बनवता येतो का? इथून मुलाखतीला सुरूवात झाली. 

यावर तो म्हणाला, “मला स्वतःला स्वयंपाक खूप छान बनवता येतो. कारण मी पाच वर्ष तालमीत राहिलो आहे. त्या ठिकाणी तु्म्हाला तुमचं जेवण स्वत:ला  बनवायला लागतं. त्यामुळे आम्ही प्रत्येकजण स्वत:चं जेवण स्वत: बनवायचो. पोळी, भाजी, बिरयानी असा सर्व स्वयंपाक मी अगदी उत्तम बनवतो. ”  लग्नासाठी कशी मुलगी हवी, असं विचारल्यावर आकाशने एकच अपेक्षा सांगितली. ती म्हणजे उत्तम स्वयंपाक. “ज्या मुलीला बिरयानी उत्तम बनवता येईल, अशी मुलगी मला लग्नासाठी हवी आहे. कारण ज्या मुलीला बिरयानी बनवता येते, तिला कुठलाही स्वयंपाक बनवता येऊ शकतो”, असे तो म्हणाला. 

आकाश ठोसरच्या ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाबद्दल सांगायचं तर येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे   ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळणार आहेत.  सयाजी शिंदेचा रावडी आणि तडफदार अंदाज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आकाशचा रोमान्स अर्थातच आहे. तो या चित्रपटात एका रोमॅन्टिक अंदाजात दिसणार आहे.

टॅग्स :आकाश ठोसरनागराज मंजुळेमराठी अभिनेतामराठी चित्रपट