सई म्हणतेय मी सनी लिओन सारखी सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 14:08 IST
अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहीली आहे. नुकताच सईचा वजनदार हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला. या ...
सई म्हणतेय मी सनी लिओन सारखी सुंदर
अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहीली आहे. नुकताच सईचा वजनदार हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला. या चित्रपटानंतर आता सई काय करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. परंतू चिंता करु नका सई लवकरच राक्षस नावाच्या चित्रपटातून आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. सईचा राक्षस अवतार पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षक उत्सुक असतील. परंतू सध्या सई वेगळ््याच कारण्यावरुन चर्चेत आली आहे. सईल नुकतेच एका चाहत्याने सोशल साईट्सवर सांगितले की तु मराठीतील सनी लिओनी आहेस. यावर सई न रागावता, न संतापता अगदी शांतपणे हसून म्हणाली की, मला नाही माहित लोक मला मराठीतील सनी लिओन का म्हणतात. पण जर तुम्हाला असे खरंच वाटत असेल की मी मराठी चित्रपटसृष्टीतील सनी लिओनी आहे तर याचा मला खरच आनंद आहे. कारण सनी अतिशय सुंदर दिसते, आणि तिच्याशी माझी तुलना करणे म्हणजे मी पण सुंदर आहे असेच तुमचे म्हणणे असेल ना. त्याबद्दल खरच थँक्यु. आता सईने कितीही आव आणला तरीही तिला नक्कीच माहित आहे की प्रेक्षक तिला सनी लिओन का म्हणतात. सई चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करतेच. परंतू तिच्या बोल्ड अॅन्ड हॉट अदांनी नक्कीच सईने प्रेक्षकांना घायाळ केले आहे. मराठी चित्रपटांमध्ये बिकीनी घालुन वावरणारी बिनधास्त अभिनेत्री म्हणुन देखील सई कडे पाहीले जाते. आता मग सई अणि सनीचे कम्पॅरिझन तर होणारच ना. परंतू सईने तिला विचारलेला हा प्रश्न मस्त हाताळला आणि त्याचे झक्कास उत्तर देखील दिले. याला म्हणतात सई, माईन्डब्लोईंग....