Join us  

गणेशोत्सवानिमित्त सागरिकाचा "वक्रतुंड महाकाय" हा व्हिडीओ सोशल मीडियावर लाँच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 12:19 PM

ऋषी सक्सेनाने 'काहे दिया परदेस' या मालिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेत त्याने साकारलेली शिवची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली. ही मालिका संपून बरेच दिवस उलटले असले तरी शिवची जागा प्रेक्षकांच्या मनात काय आहे.

"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ...."गणेशोत्सव अगदी उंबरठ्यावर आहे आणि सागरीकाने महाराष्ट्राच्या या लाडक्या गणरायाचं स्वागत याच शब्दात केलं आहे.सागरिका म्युझिकने "वक्रतुंड महाकाय" या खास गाण्याचा व्हिडीओ गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर नुकताच लाँच केला आहे. या व्हिडिओच दिग्दर्शन सागरिका दास यांनी केले आहे. मराठी संगीत क्षेत्रातील दोन आघाडीच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या लाडक्या अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे या दोघांच्या दमदार आवाजात हे गीत संगीतबद्ध करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये काहे दिया परदेस फेम ऋषी सक्सेना आणि घाडगे आणि सून मधील रिचा अग्निहोत्री आणि नवोदित कलाकार निरंजन जोशी यांनी आपली उत्तम अदाकारी दाखवली आहे

लगबग चालली, सारखं गोड अविट चालीचं सुपरहिट गीत देणाऱ्या सुहित अभ्यंकर ने हे गीत संगीतबद्ध केलं आहे. पारंपरिक ढोल, ताशा,  तुतारी या वाद्यांसोबत गिटार चा सुंदर मिलाफ या गाण्यात आहे. नचिकेत जोग यांनी गाण्याचे साधेसोपे, अर्थपूर्ण आणि आजच्या परिस्थितीला साजेशे असे शब्द लिहिले आहेत.सागरिका म्युझिकच्या ऑफिशिअल युट्युब चॅनेलवर आपल्याला हा व्हिडीओ पाहता येईल.

ऋषी सक्सेनाने 'काहे दिया परदेस' या मालिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेत त्याने साकारलेली शिवची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली. ही मालिका संपून बरेच दिवस उलटले असले तरी शिवची जागा प्रेक्षकांच्या मनात काय आहे. ऋषी हा मराठी नसूनही त्याला मराठीची ओढ आहे. त्यामुळेच तो मराठी इंडस्ट्रीत काम करतो आहे. काही दिवसांपूर्वी त्याने 'घाडगे & सून' या मालिकेत छोटीशी भूमिका केली होती. तसेच तो 'इश्काची नौका' या व्हिडिओ अल्बममध्ये दिसला होता. त्यानंतर आता तो  "वक्रतुंड महाकाय" व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. या गाण्याचा पोस्टरही ऋषीने इंस्टाग्राम शेअर केला होता. या पोस्टरवर तो मराठमोळ्या अंदाजात दिसतो आहे. हा अल्बम लवकरच प्रदर्शित होणार आहे. इश्काची नौका या अल्बमनंतर ऋषीचे चाहते त्याला नव्या अंदाजात पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.