Join us
Daily Top 2Weekly Top 5

रितेशचा बिस्कीट सिक्स पॅक लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 09:54 IST

सिक्स पॅकची सध्या खूप क्रेझ आहे. बॉलिवुड असो या मराठी इंडस्ट्री प्रत्येक कलाकारांमध्ये सिक्स पॅकची चर्चा तर असतेच. पण ...

सिक्स पॅकची सध्या खूप क्रेझ आहे. बॉलिवुड असो या मराठी इंडस्ट्री प्रत्येक कलाकारांमध्ये सिक्स पॅकची चर्चा तर असतेच. पण आपला मराठमोळी असा लय भारी मुलगा रितेश देशमुख याने सिक्स पॅकचा उपयोग चक्क, विनोदी शैलीने बॅन्जो या चित्रपटाच्या प्रमोशन फंडासाठी केला आहे. त्याने आपल्या पोटावर सहा बिस्कीट सिक्स पॅकवर ठेवून एक हटके असा फोटो सोशलमिडीयावर अपडेट केला आहे. रितेशचा हा मजेशीर फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना ही हसू आवरणार नाही हे नक्की