Join us

बालमजुरीच्या विरोधात रितेशने पुकारले बंड, चाहत्यांनाही केला आग्रह !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2017 15:56 IST

बालमजुरीच्या विरोधात विश्व दिवसाच्या निमित्ताने सोमवारी अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचा भाऊ धीरज देशमुख यांनी बालमजुरीच्या विरोधात बंड पुकारुन ...

बालमजुरीच्या विरोधात विश्व दिवसाच्या निमित्ताने सोमवारी अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचा भाऊ धीरज देशमुख यांनी बालमजुरीच्या विरोधात बंड पुकारुन बालकांना शाळेत पाठविण्यासाठी मदत करण्याचे चाहत्यांनाही आग्रह केला. रितेशने ट्विट केले की, ‘प्रत्येक बालकाला शाळेत जाण्याची संधी उपलब्ध करणे ही केवळ आपल्या देशासाठीच नव्हे तर मानवतासाठी मोठी सेवा आहे’. तसेच धीरजनेही ट्विट केले आहे की, ‘जसे माझ्या मुलांना सर्वात अगोदर शिक्षणाची आवश्यकता आहे, तसाच मी प्रत्येक बालकाच्या शाळेत जाण्यासाठी आणि त्या प्रति काम करण्यासाठी आग्रही आहे.’ आपल्या देशाबरोबरच विदेशातही बाल मजुरी एक मोठी समस्या आहे. बाल मजुरी थांबावी यासाठी मोेठी जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी १२ जून रोजी जागतिक बाल मजुरी विरोधी दिवस साजरा केला जातो. त्या दिवसाचे औचित्य साधून रितेश आणि धीरज देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आवाहन केले आहे. आपल्या परिसरात कुठेही बाल मजुर दिसेल तर त्याला शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देणे तसेच त्याला आवश्यक मदतही करणे, हे सर्व भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे, असेच जणू त्यांना आवाहनातून सांगायचे आहे. Also Read : ​BANKCHOR First Look : रितेश देशमुखला बाबाच्या अवतारात बघून व्हाल लोटपोट!