Join us  

Video: मराठी अभिनेत्यासह रितेशचा 'वेडेपणा'; शेअर केला मजेशीर डान्स व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 5:20 PM

Riteish deshmukh: रितेश सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा पत्नी जेनेलियासोबतचे काही मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने जेनेलियाऐवजी एका मराठी अभिनेत्यासह व्हिडीओ पोस्ट केला आहे.

महाराष्ट्राचा लाडका लेक या नावाने घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh). 'हे बेबी', 'धमाल', 'हाऊसफुल्ल','तेरे नाल लव हो गया' या आणि अशा असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेला रितेश आज प्रेक्षकवर्गासाठी नवीन नाही. उत्तम अभिनयशैली आणि वागण्यातील नम्रपणा यामुळे आज रितेश लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. रितेश सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा पत्नी जेनेलियासोबतचे काही मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने जेनेलियाऐवजी एका मराठी अभिनेत्यासह व्हिडीओ पोस्ट केला आहे.

जवळपास २० वर्ष अभिनयाला प्राधान्य देणारा रितेश 'वेड' (ved) या आगामी चित्रपटातून पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून या चित्रपटात अभिनेता शुभंकर तावडे महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.  विशेष म्हणजे शुटिंगमधून थोडासा वेळ काढत रितेश आणि शुभंकरने एक मजेशीर रिल्स तयार केलं आहे. हा व्हिडीओ रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

रितेश आणि शुभंकर हे दोघं सोनू निगमच्या आवाजातील 'ये दिल दिवाना' या गाण्यावर मजेशीर रिल करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांची ही मस्ती पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झालं आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत जेनेलिया देशमुखदेखील दिसून येत आहे.

दरम्यान,  'वेड'च्या माध्यमातून रितेश पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करतोय. तर जेनेलिया १० वर्षांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक करतीये. त्यामुळे या चित्रपट दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे.  

टॅग्स :रितेश देशमुखसेलिब्रिटीसिनेमा