Join us  

परशासोबत पुन्हा आर्ची; तुम्ही पाहिली?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 7:51 PM

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकणारी आणि प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू सध्या कुठेय? तर इन्स्टाग्रामवर.

ठळक मुद्देयेत्या १४ फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्ताला रिंकु राजगुरूचा ‘कागर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकरंद माने यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकणारी आणि प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू सध्या कुठेय? तर इन्स्टाग्रामवर. होय, मावळत्या वर्षाच्या अखेरिस आर्चीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोवर लाईक्सचा अक्षरश: पाऊस पडतोय. आता तुम्ही म्हणाल, या फोटोत असे काय आहे, तर आर्शी अन् परशा आहेत़ होय, रिंकूने आपल्या इन्स्टाग्रामवर हा खास फोटो शेअर केला. यात ती परशा अर्थात आकाश ठोसरसोबत दिसतेय. या फोटोतील आणखी एक खास बाब म्हणजे, आर्चीचा बदलेला अंदाज. होय, आर्ची पुरती बदलली आहे. तिच्यातील हा बदलही डोळ्यांत भरणारा आहे़.

‘सैराट’मधील आर्ची आता बरीच ग्लॅमरस झाली आहे. ‘सैराट’मध्ये आर्ची प्रचंड भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग,तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. तरुणार्ई जणू आर्ची नावाचा जप करु लागली. या सिनेमाने आर्ची अर्थात रिंकू राजगुरुचं संपूर्ण आयुष्यच पालटलं. सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणा-्या रिंकूचा आता फुलआॅन मेकओव्हर झाला आहे. सैराट रिलीज होण्याआधीची रिंकू आणि आत्ताची रिंकू यांत बराच फरक पाहायला मिळतोय़, विश्वास बसत नसेल तर तुम्ही पाहा, आर्ची अन् परशाचा हा खास फोटो.

गावरान अंदाजातील रिंकूचा जणू काही कायापालट झाल्याचे तुम्हाला तिच्या जुन्या आणि आताच्या फोटोवरुन सहज कळेल. रिंकुचे अनेक नवीन फोटो सोशल मीडियावर पाहायल्यावर तुमच्या लक्षात येईल की तिने तिचे वजन ही कमी केले आहे.  गेल्या काही महिन्यांपासून रिंकु आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे.

येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्ताला रिंकु राजगुरूचा ‘कागर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकरंद माने यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

 

टॅग्स :रिंकू राजगुरूआकाश ठोसर