Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिंकू राजगुरूनं थेट गाठलं लंडन, शेअर केला तिथला लेटेस्ट व्हिडीओ

By तेजल गावडे | Updated: October 15, 2020 13:41 IST

रिंकू राजगुरूने व्हिडीओच्या माध्यमातून लंडनला गेल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे.

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एका रात्रीत रिंकू महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. या चित्रपटानंतर रिंकू राजगुरूचा फॅन फॉलोव्हिंगदेखील चांगलाच वाढला. रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिथून चाहत्यांशी संवाद साधत असते. इतकेच नाही तर ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून रिंकू राजगुरूलंडनला गेल्याचे समजते आहे.

काही दिवसांंपूर्वी रिंकू राजगुरूने बॅगसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यावेळी तिने मी कुठे प्रवास करते आहे, हे ओळखा असे चाहत्यांना म्हटले होते. 

त्यानंतर आता रिंकू राजगुरूने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने लंडन हे लोकेशन नमूद केले आहे. या व्हिडीओत तिने पाठीला बॅग अडकवलेली दिसते आहे. 

रिंकू लंडनला शूटिंगसाठी गेली आहे की फिरण्यासाठी हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र सध्या अभिनेत्री प्रार्थना बेहरेदेखील लंडनमध्ये असून ती तिथे आगामी प्रोजेक्ट्सचे शूटिंग करत आहे. त्यामुळे रिंकूचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 

सैराट चित्रपटानंतर रिंकूला अनेक ऑफर्स आल्या. यानंतर ती कागर, मेकअप या मराठी सिनेमांमध्ये दिसली. त्यानंतर ती नुकतीच हंड्रेड या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकली. यात लारा दत्ताही मुख्य भूमिकेत होती.

लवकरच रिंकू बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे झुंड. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूलंडन