Join us  

रिंकू राजगुरू पुन्हा एकदा व्हिडीओतील अदांमुळे आली चर्चेत, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:17 AM

नुकताच रिंकू राजगुरूने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच रिंकू राजगुरूने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रिंकू राजगुरू हिने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिले आहे बहारा.. या व्हिडीओत रिंकू बहारा या गाण्यावर लाजताना हसताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओतील अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. रिंकू राजगुरूची व्हिडीओ शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही तिने व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :रिंकू राजगुरूप्रथमेश गीते