Join us  

रेशम टिपणीसची लेक आहे तिचीच झेरॉक्स कॉपी, हुबेहुब दिसते तिच्यासारखी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 6:53 PM

रेशमची लेक रिशिका ही आपल्या आईप्रमाणेच सुंदर आणि तितकीच ग्लॅमरस आहे.

सिने इंडस्ट्रीत एक उत्तम अभिनेत्री असल्याचे सिद्ध करणारी रेशम टिपणीस आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग असते. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते. अगदी त्याचप्रमाणे तिची मुलगी रिशिकासुद्धा तिच्यासारखी सुंदर आहे. रेशम टिपणीस लेकीचे नाव रिशिका असे आहे. रिशिका सध्या 2४ वर्षांची असून तिचं तिच्या आईशी म्हणजे रेशमशी विशेष नातं आहे.

 प्रत्यक्ष जीवनात रिशिका कशी आहे हे तुम्हालाही जाणून घ्यायची इच्छा असेल. रेशमची लेक रिशिका ही आपल्या आईप्रमाणेच सुंदर आणि तितकीच ग्लॅमरस आहे. रिशिकाचा एक फोटो समोर आला असून त्यात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो आहे. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे. त्यामुळे तिचा  हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे. आईप्रमाणेच रिशिकाही मॉर्डन विचारांची आहे. रिशिका मनमौजी आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेणारी असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल नेटवर्किंग साईटवरही रिशिका एक्टिव्ह असते. रेशमचा तिचा पहिला पती संजीव सेठशी घटस्फोट झालाय. असं असलं तरी संजीव आणि त्याची दुसरी पत्नी लताशी रिशिकाचे चांगलेच संबंध आहेत. रिशिका आणि लताचे फोटोही सोशल नेटवर्किंग साईटवर पाहायला मिळतात. एकंदरितच बॉलिवूड स्टारकिडप्रमाणे मराठी स्टारकिडसचा देखील सोशल मीडियावर बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :रेशम टिपणीस