Join us  

'माझा छकुला' चित्रपटात गिधाड खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याविषयी या गोष्टी माहितीय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 9:00 AM

'माझा छकुला' चित्रपटानंतर झपाटलेला, आमच्यासारखे आम्हीच, अशी ही बनवाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, फेका फेकी, धुमधडाका, गंमत जंमत सारख्या गाजलेल्या चित्रपटात बिपीन वर्टी यांनी भूमिका साकरल्या आहेत.

रुपेरी पडद्यावर१९९४  साली सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे  'माझा छकुला'. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला तर तितक्याच आवडीने पाहिला जातो.चित्रटाची कथा कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे चित्रपटाने रसिकांची पसंती मिळवली होती. धमाकेदार चित्रपट जितका रसिकांना भावला, तितक्याच कलाकारांच्या भूमिकांनाही पसंती दिली. रसिकांनी चित्रपटातील कलाकारांना तसंच त्यांच्या भूमिकांना डोक्यावर घेतलं.  

विजय चव्हाण,महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ तसेच बालकलाकाराच्या भूमिकेत झळकलेला आदिनाथ कोठारे चित्रपटातील सगळ्याच भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या. चित्रपटात आणखी एक खास भूमिका लक्षवेधी ठरली होती ती गिधाड खलनायकाची.ही भूमिका आजही रसिकांच्या आठवणींत आहे.

 

विशेष म्हणजे गिधाड या भूमिकेने सर्वांनाच धडकी भरवली होती. ही भूमिकाही प्रचंड गाजली होती. बिपीन वर्टी यांनी ही भूमिका मोठ्या खुबीने साकारली होती.बिपीन आणि महेश कोठारे यांच्यात खूप चांगली मैत्री होती.इतकंच काय तर महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटात बिपीन झळकले आहेत. 

मात्र माझा छकुला चित्रपटातल्या गेटअपमुळे त्यांना ओळखणेही अशक्यच. माझा छकुला चित्रपटानंतर झपाटलेला, आमच्यासारखे आम्हीच, अशी ही बनवाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, फेका फेकी, धुमधडाका, गंमत जंमत सारख्या गाजलेल्या चित्रपटात बिपीन यांनी भूमिका साकरल्या आहेत. फक्त अभिनयच नाहीतर तर त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. उत्तम अभिनेता असण्यासोबत ते उत्तम दिग्दर्शकही होते. फेका फेकी, एक गाडी बाकी अनाडी, डॉक्टर डॉक्टर या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. आज बिपीन वर्टी हयात नसले तरी त्यांच्या भूमिकांमुळेच ते आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे.

टॅग्स :आदिनाथ कोठारेनिवेदिता सराफ