Join us

रसिकाला लकी ठरतो बर्थडे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 13:58 IST

रसिका धबडगावकर हे नाव आता घराघरात पोहचले आहे. रसिकाने माझ्या नवºयाची बायको या मालिकेत रंगवलेले शनायाचे पात्र लोकांना आवडत ...

रसिका धबडगावकर हे नाव आता घराघरात पोहचले आहे. रसिकाने माझ्या नवºयाची बायको या मालिकेत रंगवलेले शनायाचे पात्र लोकांना आवडत नसले तरी तिच्या भूमिकेचे मात्र कौतुक होत आहे. शनायाचे पोस्टर गर्ल या चित्रपटामध्ये एक गाणे केले होते. या लावणीमध्ये ती एकदम झक्कास दिसली होती आणि आणि तिने आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळही केले होते. शनायाने एका मुलाखतीत तिच्या वाढदिवसाच्या दिवशी घडणाºया आनंदाच्या गोष्टींविषयी उलगडा केला आहे. वाढदिवस हा प्रत्येकासाठीच स्पएशल असतो. यादिवशी सर्वजण आपल्याला खास ट्रीटमेंट देत असतात. पण बर्थडेच्या दिवशी जर अनोखे सरप्राईज मिळाले तर कोणाला आवडणार नाही बरं. रसिकाला देखील तिच्या दोन्ही बर्थडेच्या वेळी असेच गिफ्ट मिळाले आहे जे ती कधीच विसरु शकणार नाही. रसिका सांगते,  ३ आॅगस्टला माझा वाढदिवस असतो आणि मला चांगलंच आठवतंय गेल्या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी मला पोश्टर गर्ल चित्रपटात डान्स करण्याची आॅफर आली होती. या वाढदिवसाच्या दिवशी काय विशेष घडतंय याचा मी विचारच करत होते, त्याचदरम्यान मला माज्या नव-याची बायको मालिकेसाठी विचारण्यात आलं आणि काही दिवसात आॅडीशन देऊन, शूटिंगला सुरुवात पण झाली.रसिकाला तिचा वाढदिवस चांगलाच लकी आहे असे आपण म्हणुन शकतो. कारण तिच्या वाढदिवशी तिला मिळालेल्या या मालिकेमुळे नक्कीच तिचे नशीब बदललेले आहे. आज रसिकाला शनाया या नावाने सगळीकडे ओळखले जातेय. सध्या तिच्याकडे दोन चांगले आणि दमदार भूमिका असलेले चित्रपट आहेत. आता आगामी वाढदिवसाच्या दिवशी रसिकाला नशीब काय नवीन सरप्राईज देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.