Join us

राणी लक्ष्मीबाई साकारणारी उल्का आता मराठीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 11:15 IST

छोट्या पडद्यावर 'झाँसी की रानी' लक्ष्मीबाई ही भूमिका साकारणारी उल्का गुप्ता आता मराठी सिनेमात एंट्री करणार आहे. 'ओढ' असं ...

छोट्या पडद्यावर 'झाँसी की रानी' लक्ष्मीबाई ही भूमिका साकारणारी उल्का गुप्ता आता मराठी सिनेमात एंट्री करणार आहे. 'ओढ' असं या सिनेमाचे नाव असून दिनेश ठाकूर त्याचे दिग्दर्शन करणार आहेत.या सिनेमासाठी उल्का मराठीचे धडे गिरवत आहे. विशेष म्हणजे आपल्या सहकलाकारांनी आपल्याशी मराठीतच संवाद साधावा असा उल्काचा खास आग्रह असतो. समीर धर्माधिकारीसह उल्काने राणी लक्ष्मीबाईंची भूमिका मोठ्या खुबीने रंगवली. ही भूमिका रसिकांनाही भावली.आता छोट्या पडद्यावर दाखवलेली अभिनयातील कमाल मोठ्या पडद्यावरही दाखवण्यासाठी उल्का सज्ज झाली आहे. लव्हस्टोरी असलेल्या या सिनेमात उल्कासह भाऊ कदम, मोहन जोशी हे कलाकारही सिनेमात झळकणार आहेत.ही एक लव्हस्टोरी असून नुकतेच सिनेमातील म्युझिक रेकॅार्डींगही करण्यात आलेय. स्वप्नील बांदोडकर,नेहा राजपाल  आणि रोहित राऊत, आनंदी जोशी यांनी गायली असून सिनेमातील गाणी संजाली रोडे आणि अभय इनामदार यांनी शब्दबद्ध केली आहेत.