Join us  

या कारणामुळे रंग महालात रंगले मृण्मयी आणि प्रशांत...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 5:04 PM

या सिनेमाच्या शूटच्या वेळी आलेले अनुभव सांगताना दिग्दर्शक अलोक श्रीवास्तव यांनी सांगितले की, “एक पोलीस ऑफिसर आणि एक कादंबरीकार यांच्या प्रेमाची आणि त्यातून आपल्याला काही तरी शिकवून जाणारी गोष्ट म्हणजे एंड-काऊंटर. या सिनेमामधील एक रोमांटिक गाणे आम्ही नाशिक जवळील चांदवड येथील रंग महालमध्ये शूट केले.

महाराष्ट्राला सांस्कृतिक वारसा खूप आहे. त्याचप्रमाणे इथे पूर्वीच्या काळातील काही महाल राजे-राजवाडे आहेत जे लोकांना आज ही खूप प्रेरणादायी आणि आकर्षित करत असतात. असाच एक महाल म्हणजे होळकरकालीन कलेचा एक सुंदर अविष्कार म्हणजे चांदवडचा “रंगमहाल”. सह्यादीच्या पर्वतरांगेत मुंबई -आग्रा महामार्गावर वसलेल्या चांदवडला ऐतिहासिक वारसा आहे. येथेच अहिल्याबाई होळकर यांनी रंगमहाल बांधला. अशा भव्य कलाकृतीमध्ये एका सिनेमाच्या रोमांटिक गाण्याचे शूट चालू आहे. तो सिनेमा आहे ए. जे. एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेअंतर्गत जतिन उपाध्याय, अलोक श्रीवास्तव निर्मित, आणि अलोक श्रीवास्तव दिग्दर्शित “एंड-काऊंटर”.

या सिनेमाच्या शूटच्या वेळी आलेले अनुभव सांगताना दिग्दर्शक अलोक श्रीवास्तव यांनी सांगितले की, “एक पोलीस ऑफिसर आणि एक कादंबरीकार यांच्या प्रेमाची आणि त्यातून आपल्याला काही तरी शिकवून जाणारी गोष्ट म्हणजे एंड-काऊंटर. या सिनेमामधील एक रोमांटिक गाणे आम्ही नाशिक जवळील चांदवड येथील रंग महालमध्ये शूट केले.

खूप चांगला अनुभव होता, आणि तो महाल म्हणजे आम्हाला एक तयार सेट मिळाला होता. त्यामुळे तिथे वेगळा असा सेट उभारायची काही गरजच पडली नाही. या महालामध्ये कोणाला जायची परवानगी नाही. पण आम्हाला मिळाली आणि जसे आम्ही आत गेलो, आणि पाहणी केली तर आमच्या लक्षात आले की, तिथे चार महाल आहेत. एक समोरच्या बाजूला, तेवढाच मोठा मागच्या बाजूला आणि दोन त्याच आकाराचे खाली तळमजल्याला महाल आहेत. पण आम्ही पुढच्या बाजूच्या महालमध्ये शूट केले आणि खूप मज्जा आली. “में तो जी राहा तेरे प्यार में”, असे या गाण्याचे बोल आहेत.”

त्यांनी पुढे सांगितले की, “शूट करताना आम्ही मुख्य गेट बंद करून घेतलं होतं पण नंतर बघितलं तर आमच्या चारी बाजूने शूट बघायला जवळ जवळ हजारोंच्या संख्येने लोकं जमा झाली होती. तेव्हा आम्हाला समजलं की या महालात आत येण्यासाठी काही चोर रस्तेसुद्धा आहेत आणि तिथून ती मंडळी आली होती. असो, पण या गाण्याचे शूट अजून दोन ठिकाणी झाले. मृण्मयी कोलवालकर आणि प्रशांत नारायणन यांच्यासोबत आधी पण काम केलं असल्याने त्यांची काम करण्याची पद्धत माहित होती, ते एक उत्तम कलाकार आहेत. आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप मज्जा आली. या गाण्याच्या शूट लोकेशनमुळे हे गाणं नक्की सगळ्यांना आवडेल याची मला खात्री आहे.”

तर या सिनेमाचे मुख्य नायक प्रशांत नारायणन यांनी सांगितले की, “आपण कितीही पैसे खर्च केले असते तरी इतका सुंदर सेट उभारू शकलो नसतो. या महालाची ती सुंदरता जी आधी पासून आहे ती निर्माण करता आली नसती, त्यामुळे मी खूप आनंद घेतला तिथे शूट करताना.”