Join us

Raksha Bandhan Special : खुशबू तावडे व श्रुती अत्रे सांगत आहेत त्यांच्या बहिणींविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 08:30 IST

आता बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे तसेच त्यांना पाठिंबा फक्त मोठा भाऊच नाही तर बहीण देखील देऊ शकते आणि भाऊ बहिणीचे रक्षण व तिला मदत करतो हा समज मोडीत काढत झी युवाच्या अभिनेत्रींनी त्यांच्या बहिणींविषयी काही गोष्टी शेअर करून साजरा केला आगळा वेगळा रक्षाबंधन. 

ठळक मुद्देझी युवावर आगळावेगळा रक्षाबंधन

'आम्ही दोघी' ही नवीन मालिका झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली आहे. 'आम्ही दोघी' मालिकेचे कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे.  रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीचा सण. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून तिच्या रक्षणाचे वचन त्याच्याकडून घेते. काळ बदलला, पुरुषप्रधान समाजात स्त्रिया देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या जबाबदाऱ्या लीलया पार पाडत आहेत. त्यामुळे आता बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे तसेच त्यांना पाठिंबा फक्त मोठा भाऊच नाही तर बहीण देखील देऊ शकते आणि भाऊ बहिणीचे रक्षण व तिला मदत करतो हा समज मोडीत काढत झी युवाच्या अभिनेत्रींनी त्यांच्या बहिणींविषयी काही गोष्टी शेअर करून साजरा केला आगळा वेगळा रक्षाबंधन. 

'आम्ही दोघी'मधील अभिनेत्री खुशबू तावडे म्हणाली, 'मला भाऊ नाही पण एक गोड छोटी बहीण आहे. तितिक्षा तावडे ही माझी सख्खी लहान बहीण आहे जी स्वतः एक अभिनेत्री आहे. मी मोठी असली तरी देखील ती कधी कधी मोठ्या बहिणीची भूमिका निभावते. आम्हा बहिणींच्या जोडींमध्ये एक वेगळेपण आहे ते म्हणजे आम्ही इतरभावाबहिणींसारखे कधीच भांडत नाही. आम्ही एकमेकींना नेहमीच सपोर्ट करतो तसेच गाईड देखील करतो. एकमेकांचे शो पाहून आम्ही त्यातील आमच्या हेअर मेकअप, अभिनय यांच्यावर टीकाटिपणी करतो. आम्हा बहिणी बहिणींचे काही रुल्स आहेत. मी तिच्याबद्दल अत्यंत पजेसिव्ह आहे.''बापमाणूस' मालिकेतील श्रुती अत्रे म्हणाली, 'माझ्या लहान बहिणीचे नाव श्वेता आहे. ती लहान जरी असली तरी ती खूप स्मार्ट आहे. मी तिच्यापासून इन्स्पायर होते. आणि मला जेव्हा इमोशनल सपोर्टची गरज असते तेव्हा ती मला सपोर्ट करते. लहान बहीण असली तरी कधी कधी ती मोठ्या बहिणी सारखी वागते. ती नेहमीच माझ्या चांगल्या वाईट वेळेत माझ्यासोबत असते.'