Join us  

'या सत्तेच्या चक्रव्युहात कोण कोणाला...', 'खुर्ची' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 7:45 PM

सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.

'आता खुर्ची आपलीच’ असं म्हणत ‘खुर्ची' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट आणि अक्षय वाघमारे यांची मुख्य भूमिका आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. अंगावर काटा आणणारा असा हा ट्रेलर असून या सिनेमात सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे. 

'मी राजवीर राजाराम देसाई... एकदिवस खुर्ची आपलीच असणार' या वाक्याने ट्रेलरची सुरुवात होते. २ मिनिटे २१ सेंकदाच्या या ट्रेलरमध्ये दमदार संवाद आणि गाणे ऐकू येत आहेत. सत्तेसाठी सुरु झालेल्या या वादळात घातपातही दिसून येत आहे. विशेष म्हणजे बालकलाकार म्हणून आर्यन हगवणेने साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरतेय. अगदी लहान वयात आर्यनने चित्रपटातील भूमिका उत्तमरीत्या पार पाडल्याचं ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. तर अभिनेता राकेश बापट आणि अक्षय वाघमारे स्वॅग पाहायला मिळतोय.  

रोमाचंक ट्रेलर पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. या ‘खुर्ची’चं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. ‘खुर्ची’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट १२ जानेवारी २०२४ मध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.  ट्रेलर मध्ये पाहायला मिळाल्याप्रमाणे नेमकं सत्तेच्या खुर्चीवर कोण बाजी मारणार हे चित्रपटगृहातच कळेल.

 ‘खुर्ची’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांची असून दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलली आहे.  या चित्रपटात राकेश आणि अक्षयसह आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घग, अभिनेत्री , प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :राकेश बापटसेलिब्रिटीसिनेमामराठी अभिनेता