Join us  

Exclusive: दे आर मेंटली इल..., ‘Raanbaazaar’वरून ट्रोल करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचं उत्तर, वाचा काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 2:57 PM

Marathi Web Series RaanBaazaar, Prajakta Mali Interview : ‘रानबाजार’चा टीझर रिलीज झाला तसा, प्राजक्ता माळी व तेजस्विनी पंडित दोघी ट्रोल झाल्यात. सर्वाधिक ट्रोल झाली ती प्राजक्ता माळी.

Marathi Web Series RaanBaazaar : प्राजक्ता माळी ( Prajakta Mali) व तेजस्विनी पंडितच्या (Tejaswini Pandit) ‘रानबाजार’ (RaanBaazaar) या वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. सर्वाधिक चर्चा होतेय ती प्राजक्ता व तेजस्विनीच्या या सीरिजमधील बोल्डनेसची. प्राजक्ता व तेजस्विनी दोघींनीही या चित्रपटात अतिशय बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. साहजिकच, ‘रानबाजार’चा टीझर रिलीज झाला तसा, यावरून दोघी ट्रोल झाल्यात. सर्वाधिक ट्रोल झाली ती प्राजक्ता माळी . तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं म्हणत लोकांनी तिला ट्रोल केलं. आता या ट्रोलिंगवर आणि ‘रानबाजार’ या सीरिजवर प्राजक्ता पहिल्यांदा बोलली आहे. ‘लोकमत फिल्मी’शी तिनं मनमोकळ्या गप्पा मारल्या.

दे आर मेंटली ईल...‘रानबाजार’चा टीझर रिलीज झाल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या. काहींना प्राजक्ता माळीच्या बोल्ड भूमिकेचं कौतुक केलं तर काहींनी प्राजक्ताला अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केलं. या बऱ्यावाईट कमेंट्सवर प्राजक्ता सविस्तर प्रतिक्रिया दिली.ती म्हणाली, तुम्ही पब्लिक फिगर असता तेव्हा अशा  बऱ्यावाईट कमेंट्स तुमच्या वाट्याला येणारच. याला तोंड द्यावंच लागतं.   तोंड द्या आणि  स्वीकारा, हाच एक पर्याय असतो. मी कमेट्स खरं तर निगेटीव्हली घेत नाही. कारण महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे. त्या कुटुंबातील काही लोक मला मुलगी मानतात, बहीण मानतात. काहींनी तर बायकोचं मानलं आहे मला. काही गर्लफ्रेन्ड म्हणून, काही आदर्श म्हणून माझ्याकडे बघतात.  या नात्यांमधली जी मंडळी आहेत ना, त्यांना कुठेतरी टीझरमधील माझी भूमिका पाहून कसं वाटलं असेल मी समजू शकते. अशा लोकांच्या कमेंट्स, त्यामागची भावना मी समजू शकते. पण ज्या अतिशय विकृत कमेंट्स आहेत. मला असं वाटतं की ती समाजातील विकृती आहे. दे आर मेंटली इल...त्यांच्याकडे मी पुर्णत: दुर्लक्ष करते. ते माझे फॅन्स नाहीत. त्यांच्या हातात एक साधन आहे म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवं. पण जे माझे खरे चाहते आहेत. त्यांनी अतिशय मनापासून कमेंट्स केल्या आहेत. त्या जेन्युअन कमेंट्स आहेत. मी त्यांच्या भावना मी समजू शकते,असं प्राजक्ता म्हणाली.

मी एक अभिनेत्री आहे...मी एक अभिनेत्री आहे. मी माणूस म्हणून जशी आहे, तसेच लोक मला माझ्या कलाकृतींमध्ये पाहू इच्छितात. पण तसं नाही. मी कलाकार आहे. मी वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आणि मी त्या केल्या पण पाहिजेत. मी त्या नाही केल्यात तर कदाचित हेच लोक म्हणतील की, हसणं, मुरडणं, लाचणं यापेक्षा वेगळं  काय केलं तिनी. असंही बोलणारे आपलेच लोक आहे. एक कलाकार म्हणून वैविध्यपूर्ण भूमिका केल्या पाहिजेत, याच विचाराने मी ‘रानबाजार’ ही वेबसीरिज स्वीकारली, असंही प्राजक्ता म्हणाली.

मी एवढं वजन वाढवलं...या सीरिजमध्ये मी सेक्सवर्करची भूमिका साकारली आहे. मी पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकली, तेव्हा मला ती प्रचंड आवडली होती. पण प्रेक्षक माझ्या भूमिकेला कसं स्वीकारतील, ही भीती मला पहिल्या दिवसापासून होतीच. मी चरित्र अभिनेत्रींच्या श्रेणीत बसणारी अभिनेत्री आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या काळजीपोटी थोडी द्विधामन:स्थिती होती. पण ती कलाकार म्हणून अजिबात नव्हती. शिवाय मला वजन वाढवायचं होतं. 65 किलोंची पाहिजेस तू मला. बेढब दिसली पाहिजे, वाकडीतिकडी दिसली पाहिजेस,असं त्यांनी मला सांगितलं होतं. तेव्हा मी 50 किलोची होते. सर, मी आत्ता मरमर करून वजन कमी केलंय, आत्ता मी कमी झाले आणि आता पुन्हा तुम्ही वजन वाढवायला सांगताय, असं मी त्यांना म्हणाले होते. यामुळेही ही सीरिज करायची की नाही, द्विधामन:स्थिती होती. पण आधी मी अभिनेत्री आहे यार...अभिनेत्रींच्या वाट्याला स्वत:ला सिद्ध करू शकतील अशा भूमिका खूप कमी येतात.  देवाच्या कृपेने मला अशा भूमिका मिळाल्या. अशी संधी येते तेव्हा कलाकार म्हणून ती सोडता कामा नये. सीरिज बघतील तेव्हा प्रेक्षकांना माझी भूमिका आवडेल, असं ती म्हणाली.

'त्या' दोघींमुळे राजकारणात आणलेल्या वादळाची रंजक गोष्ट!

'रानबाजार'... नवी कोरी वेबसीरीज पाहा फक्त प्लॅनेट मराठीवर. अ‍ॅप इन्स्टॉल करा आत्ताच!

अँड्रॉईड युजर्ससाठी >> https://bit.ly/3wCnSPx

आयफोन युजर्ससाठी >> https://apple.co/39Z5cBS

टॅग्स :रानबाजार वेबसीरिजप्राजक्ता माळी