Join us

पुष्कर-अजितची ‘दिल की बात कॅनडामध्ये रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 12:11 IST

दिल की बात सांगायला आणि ऐकायला कोणाला नाही आवडत. पण जर आपल्या कलाकारांची दिल की बात ऐकायला मिळणार असेल तर ही मजा काही औरच असेल.

दिल की बात सांगायला आणि ऐकायला कोणाला नाही आवडत. पण जर आपल्या कलाकारांची दिल की बात ऐकायला मिळणार असेल तर ही मजा काही औरच असेल.  अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि अभिनेता-गायक अजित परब यांचा ‘दिल की बात’ हा टॉक शो कॅनडामध्ये आयोजित करण्यात आला आहे.  हा म्युझिकल टॉक शो असेल ज्यामध्ये हिंदी-मराठी गाणी गायली जातील, त्याविषयी बोललं जाईल आणि त्यामागच्या आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या जातील. 

गाणं, संगीत हे प्रत्येक व्यक्तीसाठी जवळचं असतं. कधी कधी आपण गाण्यातून व्यक्त होत असतं. जास्त भावूक होतो तेव्हा त्याला गाण्याचीच साथ असते.  एका गाण्यामागे गीतकार, संगीतकार, गायक यांची मेहनत असते. त्यांच्याकडे पण त्यांनी गायलेल्या, लिहिलेल्या गाण्यामागची एक आठवण असेल.  ‘दिल की बात’ या टॉक शो मध्ये पुष्कर श्रोत्री आणि अजित परब सिनेसृष्टीत त्यांना आलेल्या अनुभवाविषयी बोलणार आहेत. तसेच ते प्रेक्षकांशी पण संवाद साधणार आहेत. पुष्कर श्रोत्री स्टँड अप अॅक्ट आणि मिमिक्री करणार आहे.

‘दिल की बात’ या टॉक शो ची एक झलक तुमच्यासाठी-