Join us

​ आमिर खान करतोय या मराठी चित्रपटाचे प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:44 IST

 बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनीस्ट आमिर खानचे कोणताही चित्रपट हीट होण्यासाठी फक्त नावच पुरेसे आहे. आमिरच्या चित्रपटात भूमिका साकारण्याचे स्वप्न तर ...

 बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनीस्ट आमिर खानचे कोणताही चित्रपट हीट होण्यासाठी फक्त नावच पुरेसे आहे. आमिरच्या चित्रपटात भूमिका साकारण्याचे स्वप्न तर सर्वांचेच असते. परंतू जर या दंगल सुरस्टारने एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन केले तर नक्कीच त्या चित्रपटाच्या टिमला आनंद होणार यात काही शंकाच नाही. असेच काही झाले आहे एका मराठी चित्रपटाच्या बाबतीत. होय, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे आगामी ती सध्या काय करतेय या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. या चित्रपटाची आमिरने दखल घेतली आहे. प्रादेशिक भाषेमध्ये दमदार चित्रपट निर्मित होत असल्याचे सांगत आमिरने देखील सैराट, नटसम्राट आणि कोर्ट या मराठीतील चित्रपटांचे कौतुक केले होते. प्रादेशिक भाषांना व्यासपीठ मिळाले पाहिजे असे म्हणणाºया आमिरने आपल्या आगामी दंगल प्रदर्शनावेळी एका मराठी चित्रपटाची दखल घेतली आहे. त्यामुळे दंगल पाहताना आपल्याला ती सध्या काय करते या मराठी चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळणार आहे. प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना प्रसिद्धी मिळण्यासाठी आमिरने मराठीतील ती सध्या काय करते या चित्रपटाच्या ट्रेलरला स्थान दिले आहे. आमिरच्या दंगल चित्रपटामध्ये कतरिना कैफच्या आणि रणबीर कपूरच्या आगामी जग्गा जासूस या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र दंगल पाहताना आता मराठी चित्रपटाचा ट्रेलर दिसणार असून यावर शिक्कामोर्तब झाले आहे.आमिरच्या दंगल या बहुचर्चित चित्रपटावेळी मराठी चित्रपटाचे प्रसिद्धी मिळणे ही मराठी चित्रपटासाठी अभिमानाचीच गोष्ट असेल.याविषयी  चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे सांगतात की, इतक्या मोठ्या कलाकाराच्या चित्रपटासोबत ती सध्या काय करतेचा ट्रेलर दाखविण्यात येणार असल्याने मी खूप आनंदात आहे. ही मराठी चित्रपटासाठी नक्कीच मोठी बाब आहे. दंगल हा हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित असा चित्रपट आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या चित्रपटासोबत एका मराठी चित्रपटाचा ट्रेलर दाखविला जाणं ही नक्कीच आनंदाची बाब आहे. याचे श्रेय मी झी स्टुडिओजला सुद्धा देईन. ती सध्या काय करतेचा ट्रेलर दंगलसोबत दाखविण्याची संधी दिल्याने मी आमिरचे आभार मानतो.