गायिका प्रियांका बर्वे नेहमीच प्रेक्षकांसमोर वेगवेगळ््या प्रकारची गाणी घेऊन आली आहे. प्रियांका एका आगामी मराठी चित्रपटासाठी लावणी गाणार असल्याचे समजतेय. याआधी चित्रपटांसाठी तिने कधीच लावणी गायली नव्हती. ती प्रथमच चित्रपटासाठी लावणी गाणार असल्याने त्यासाठी ती आवाजातील चढ-उतार आणि काही गोष्टींवर मेहनत घेत असल्याचे कळत आहे. अनेक मराठी चित्रपटातील गाण्यांना प्रियांकाने आवाज दिला आहे.अल्पावधीतच तिने स्वत:ची वेगळी ओळख मराठी चित्रपसृष्टीत निर्माण केली आहे. प्रियांका व्हर्सटाईल गायिका असल्याचे तिने वेळोवेळीच दाखवून दिले आहे. बसस्टॉप या आगामी मराठी चित्रपटात देखील ती एक वेगळ््या स्टाईलचे युथ साँग गाणार आहे. आता ही प्रियांकाची ठसकेबाज लावणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का हे लवकरच समजेल.
प्रियांका गाणार लावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 14:28 IST