Join us

प्रियंका चोप्राने 'काय रे रास्कला'फर्स्ट लूक केला लाँन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2017 15:41 IST

भरघोस व्यावसायिक यश, पाठीवर पडलेली समिक्षकांची कौतुकास्पद थाप व तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेता पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित 'व्हेंटिलेटर' नंतर ...

भरघोस व्यावसायिक यश, पाठीवर पडलेली समिक्षकांची कौतुकास्पद थाप व तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेता पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित 'व्हेंटिलेटर' नंतर प्रियंकाने काय रे रास्कला म्हणत तिच्या दुसऱ्या मराठी चित्रपटाचं पोस्टर नुकतच लाँच केलय .कौटुंबिक मूल्ये, प्रथा, परंपरा आणि नातेसंबंध ह्यावर व्हेंटिलेटर सिनेमाने प्रकाशझोत टाकला होता. सिनेमाचं रसिकांनी भरभरून कौतुक होते.'व्हेंटिलेटर'  ची सर्वत्र हवा असतानाच प्रियंकाच्या दुसऱ्या मराठी सिनेमाची चर्चा सिनेसृष्टीत जोरात सुरु होतीच आणि इतके दिवस आतुरतेने वाट पाहायला लावणारा हा चित्रपट 'काय रे रास्कला' हसवत हसवत फसवायला आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. सूटाबूटात असलेलं नारळ पाणी आपल्याला येथे पाहायला मिळतंय जे पोस्टरवरून ही आपल्या आजूबाजूच्या गरम वातावरणात जणू गारवा आणतंय. क्रिएटिव्हली अट्रॅक्टिव्ह असलेल हे पोस्टर सोशल मीडियावर धुमाकूळ गाजवणार आहे यात काहीच शंका नाही. गिरिधरन स्वामी दिग्दर्शित या सिनेमात गौरव घाटणेकर आणि भाग्यश्री मोटे ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात कॉमेडीचा आणखी तडका देण्यासाठी निखिल रत्नपारखी, सुप्रिया पाठारे आणि अक्षर कोठारी यांसारखे इतर अनेक नामवंत कलाकार असणार आहेत. कुनिका सदानंद ह्या सहाय्यक निर्मात्या असून काय रे रास्कलाच्या संगीताचा साज रोहन – रोहन या संगीतकार जोडीने साधला आहे.संवेदनशील व हृदयस्पर्शी अशा व्हेंटिलेटर नंतर सर्वांचे हास्य-विनोदाने मनोरंजन करण्यासाठी डॉ. मधू चोप्रा आणि प्रियंका चोप्रा यांच्या पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित काय रे रास्कला  हा सिनेमायेत्या १४ जुलै ला संपूर्ण महाराष्ट्राला निखळ हसविण्यासाठी प्रदर्शित होणार आहे.