प्रिया उमेश दिसणार का एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 17:22 IST
अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट जोडी प्रेक्षकांना लवकरच मोठ्या पडदयावर दिसू शकते. प्रिया आणि ...
प्रिया उमेश दिसणार का एकत्र?
अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट जोडी प्रेक्षकांना लवकरच मोठ्या पडदयावर दिसू शकते. प्रिया आणि उमेशने बरेच चित्रपट एकत्र केले होते. परंतू गेल्या काही दिवसांपासुन आपल्याला हे दोघेही मोठ्या पडदयावर एकत्र दिसलेले नाहीत. टाईमप्लीज हा या दोघांचाही शेवटचा सिनेमा होता. या चित्रपटातील प्रियाचा खट्याळ अभिनय प्रेक्षकांना आवडला होता. परंतू या दोघंचाही चाहते या जोडीला पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच की काय प्रिया-उमेशची जोडी आपल्याला लवकरच चित्रपटात दिसणार असल्याचे समजतेय. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे देखील कळतेय. प्रियाने बालकलाकार म्हणुन चित्रपटसृष्टीत कामाला सुरुवात केली होती. तिने अनेक मराठी चित्रपट तसेच हिंदी मध्ये मुन्नाभाई एमबीबीएस यासारख्या चित्रपटात काम करुन स्वत:च्या अभिनयाची चुणूक दाखविलीच होती. उमेश सोबत जवळपास सात वर्षे रिलेशनशिपमध्ये राहील्यानंतर त्यांनी लग्न केले. नुकतेच त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पुर्ण झाले आहेत. उमेश देखील सध्या चित्रपट आणि त्याच्या डोन्ट वरी बी हॅपी या नाटकांच्या प्रयोगामध्ये व्यस्त आहे. तर प्रियाचा वजनदार हा चित्रपट आजुनही चित्रपगृहांमध्ये चालला आहे. या दोघांची आॅनस्क्रिन जोडी मोठ्या पडदयावर पाहायला प्रेक्षकांना आवडत असल्याने लवकरच आपल्याला हे क्युट कपल चित्रपटात दिसणार असल्याचे कळतेय. सध्या तरी प्रिया तिच्या काही चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. आता हे दाएघे नव्या चित्रपटासाठी कधी आणि कसा वेळ काढतात हे लवकरच समजेल. परंतू जसे प्रेक्षक या दोघांना चित्रपटात पाहायला उत्सुक आहेत तसेच हे दोघे देखी एकमेकांसोबत काम करण्यासाठी फारच अतुर असल्यचे कळतेय. म्हणजे आता काही झाले तरी आपल्याला ही जोडी रुपेरी पडदयावर पुन्हा एकदा दिसणार हे नक्की