Join us  

'मला काहीही फरक पडत नाही'; पाडव्याला उमेशकडून काय गिफ्ट हवं? प्रियाने दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 11:08 AM

Priya bapat: प्रिया आणि उमेश या जोडीचं एकमेकांसोबत कमाल बॉण्डिंग आहे. मात्र, प्रियाच्या उत्तरामुळे उमेशही थक्क झाला.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि तितकीच कसदार अभिनयशैली असलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. नाटक, सिनेमा, मालिका आणि वेबसीरिज अशा प्रत्येक माध्यमातून तिने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कायम तिची चर्चा रंगत असते.  सध्या सगळीकडे दिवाळीचं आनंददायी वातावरण आहे.  यामध्येच प्रियाला पाडव्याच्या निमित्ताने नवऱ्याकडून म्हणजेच उमेश कामतकडून कोणतं गिफ्ट हवंय हे तिने नुकतंच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

अलिकडेच प्रियाने  'मिरची मराठी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला पाडव्याला उमेशकडून कोणतं गिफ्ट हवंय असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, मला अशा कोणत्याही गोष्टींचा फरक पडत नाही, असं तिने उत्तर दिलं.

"माझ्या अशा काही अपेक्षाच नसतात की माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट करावं. मला काहीही फरक पडत नाही. तू मला काहीही देऊ नकोस. माझी ही एक अपेक्षा नक्की असते की त्या दिवशी किंवा खरं तर कुठल्याही दिवशी, पाडवा वगैरे मला काही मॅटर करत नाही. माझ्या पार्टनरने मला दिवसातले काही क्षण स्पेशल फिल करावं. काही बनवून नाही तर मग फक्त मिठी मारली किंवा रस्त्यातून चालताना हात धरला. इतकं साधं छोटं सोपं. माझ्या या पलिकडे काहीच अपेक्षा नसतात," असं प्रिया म्हणाली.

पुढे ती म्हणते, दिवाळीला नवऱ्याकडून गिफ्ट मिळालं पाहिजे किंवा पाडव्याला मला ओवाळणीत तुम्ही काय देणार, त्यानंतर गुढीपाडव्याला मला ओवाळणीत तुम्ही काय देणार. म्हणजे आज लक्ष्मीपूजन आहे तर सोनं घेतलं पाहिजे वगैरे असं मला काही वाट नाही.  मला फराळ करायला आवडतो जो त्यालाही आवडतो. गणपती असेल किंवा जो कोणता सण असेल त्यावेळी जे जे करायचं असतं ते सगळं मला करायला आवडतं. त्यामुळे पाडव्याला असं वेगळं काही होत नाही. दरम्यान, प्रिया आणि उमेश या दोघांचं लव्ह मॅरेज असून त्यांचं मैत्रीचं नातं जात आहे. त्यामुळे त्यांच्या या भन्नाट बॉण्डिंगची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. 

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामतसेलिब्रिटींची दिवाळीसिनेमा