संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा ३' (Ye re ye re paisa 3) उद्या प्रदर्शित होत आहे. सिनेमात उमेश कामत, संजय नार्वेकर, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव यांची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलर आला. ट्रेलरने सर्वांना हसवलंच त्यामुळे आता सिनेमाही खळखळून हसवणार यात शंका नाही. या सिनेमातून उमेश कामतनेही (Umesh Kamat) चार्मिंग लूकने लक्ष वेधून घेतलं आहे. यानिमित्त त्याची बायको म्हणजेच अभिनेत्री प्रिया बापटने (Priya Bapat) सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
प्रिया बापटने 'ये रे ये रे पैसा ३'च्या टीमसोबत फोटो शेअर केला आहे. ती लिहिते, "मला हसायला खूऽऽप आवडतं आणि त्यात हसत हसत डोकं गुंतूवून टाकणारी पटकथा असेल तर कायच मज्जा! १८ जुलै उद्यापासून चित्रपटगृहात नक्की बघा!
सगळ्या कलाकारांचा कमाल अभिनय आणि अफलातून energy ने भरलेला, outstanding पटकथा, संकलन असलेला आणि संजय दादाच्या दिग्दर्शनाने तुम्हाला हसवत पण खिळवून ठेवणारा चित्रपट जरूर पाहा! संजय दादा खूप मनापासून Hats off to you creating this experience!
उमेश तुझ्या अभिनयातील सहजता आणि निरागसतेच्या मी २० वर्षांपूर्वी प्रेमात पडले. या चित्रपटातून तुझ्यासाठी slapstick comedy चं नवं आव्हान तू स्वीकारलंस आणि लीलया पेललेस. I am so so happy and proud wife today! तू पुन्हा सिद्ध केलंस that you have no boundaries. आणि उत्तम संधी मिळाली तर तू त्यात कमाऽऽऽऽऽल बहऽऽऽर आणशील."
लवकरच प्रिया आणि उमेशही आगामी मराठी सिनेमात दिसणार आहेत. बऱ्याच वर्षांनी ते एकत्र सिनेमात दिसणार आहेत. 'बिन लग्नाची गोष्ट' नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली.