Join us  

Video: 'गुलाबी साडी' नेसून प्रिया बापटचा व्हायरल गाण्यावर डान्स, उमेशनेही दिली साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:22 AM

सध्या गाजत असलेलं मराठी गाणं 'गुलाबी साडी'. सेलिब्रिटी कपल प्रिया बापट- उमेश कामतलाही या गाण्याची भुरळ पडली.

सोशल मीडिया रील्स सध्या तुफान व्हायरल होत असतात. कोणताही डायलॉग असो किंवा एखादं गाणं त्यावर अनेकजण रील बनवतात आणि बघता बघता ते व्हायरल होतं. त्यापैकीच एक सध्या गाजत असलेलं मराठी गाणं 'गुलाबी साडी'. गुलाबी साडी नेसून मुली हे रील बनवत आहेत तर मुलंही यावर भन्नाट डान्स करत आहेत. मराठीतील सेलिब्रिटी कपल प्रिया बापट (Priya Bapat) उमेश कामतलाही(Umesh Kamat) या गाण्याची भुरळ पडली. मग काय! या गोड कपलने सुरेख डान्स करत रील पोस्ट केलं आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत सध्या 'जर तरची गोष्ट' नाटकात काम करत आहेत. फावल्या वेळात नाट्यगृहातच दोघांनी 'गुलाबी साडी'वर जबरदस्त रील शूट केले. यामध्ये प्रियाने खरोखरंच गुलाबी साडी नेसली होती. तर उमेशने पांढरा कुर्ता पायजमा आणि गुलाबी रंगाचंच जॅकेट घातलेलं दिसत आहे. डान्स झाल्यानंतर प्रिया उमेशच्या गालावर किस करते. या जोडीकडे पाहून नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन होतं. आता त्यांचा हा 'गुलाबी साडी' डान्सही व्हायरल होतोय.

उमेश-प्रिया ही जोडी कमालच आहे. त्यांचे फोटोस व्हिडिओ, डान्स, गाणं, नाटक, सिनेमा काहीही असो हिटच होतं. आता देखील 'जर तरची गोष्ट' मधून त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. दोघांच्या लग्न, प्रेमाचे किस्सेही सर्वांनाच माहित आहेत. 'आणि काय हवं' ही त्यांची सीरिज तर प्रचंड गाजली. सर्वांना आपलंसं करणारी ही जोडी आहे यात शंका नाही.

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामतमराठी अभिनेतासोशल मीडिया