सलमान खानच्या उपस्थितीत 'रुबिक्स क्यूब' या चित्रपटाचा शानदार सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 14:03 IST
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट येऊ घालत आहेत. हे सर्व चित्रपट विविध कथेवर आधारित आहेत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीची नेहमीच चर्चा ...
सलमान खानच्या उपस्थितीत 'रुबिक्स क्यूब' या चित्रपटाचा शानदार सोहळा
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट येऊ घालत आहेत. हे सर्व चित्रपट विविध कथेवर आधारित आहेत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीची नेहमीच चर्चा असते. या चित्रपटांना पसंतीदेखील मोठया प्रमाणात मिळत आहे. आता असाच एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रूबिक्स क्यूब असे या चित्रपटाचे नाव आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट आहे. नुकतेच मुंबईमध्ये रुबिक्स क्यूब या चित्रपटाचा शानदार सोहळा पार पडला. हा सोहळा अनेक कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला आहे. विशेष म्हणजे या सोहळयाला चार चाँद लावले आहेत, ते म्हणजे बॉलिवुडचा दबंग अर्थातच सलमान खान. या सोहळयाला बॉलिवुडच्या सुपर हिरोने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले होते. तसेच या चित्रपटाच्या संगीत प्रकाशना दरम्यान चित्रपटातील कलाकार मेधा मांजरेकर, महेश मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, गश्मीर महाजनी आदी कलाकार आणि तंत्रज्ञ अशी संपूर्ण टीम उपस्थित होती. रूबिक्स क्यूब या चित्रपटाच्या माध्यमातून गश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडे ही जोडी पहिल्यांदाच एकत्रित झळकणार आहे. अशी ही अनोखी जोडी या चित्रपटातून नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. मृण्मयीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीला कुंकू, अग्निहोत्र या लोकप्रिय मालिका दिल्या आहेत. त्याचबरोबर नटसम्राट, कटयार काळजात घुसली, अनुराग, मामाच्या गावाला जाऊ या, पुणे व्हिया बिहार असे अनेक चित्रपटदेखील तिने केले आहेत. त्यामुळे आता तिच्या या रूबिक्स क्यूब या आगामी चित्रपटाविषयी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.