Join us  

प्रार्थना बेहेरेचा आज वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2017 11:54 AM

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिचा आज वाढदिवस आहे. या अभिनेत्रीने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर ...

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिचा आज वाढदिवस आहे. या अभिनेत्रीने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर तिने बॉलिवुडमध्येदेखील अनेक चित्रपट केले आहेत. त्यामुळे ही अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून ओळखली जाते.  वडोदयात या अभिनेत्रीचा जन्म झाला आहे.  खरं तर प्रार्थना ही पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. ही मालिका करण्यापूर्वी ती  एका डान्स टिचिंग शोमध्ये डान्सर म्हणून काम करत होती. तसेच कोरियोग्राफर सरोज खान या शोमध्ये प्रमुख गाण्यांवर डान्सचे धडे द्यायच्या. टिव्हीवरील अगदी छोट्याशा भूमिकेतून प्रार्थनाच्या प्रवासाची सुरूवात झाली आहे. तिचा  हा प्रवास अतिशय रंजक असा राहिलेला आहे. विशेष म्हणजे प्रार्थनाने पवित्र रिश्ता ही अतिशय गाजलेल्या मालिकेतून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली आहे. ती या मालिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या लहान बहिणीची भूमिका साकारत होती. तसेच स्टार वन वरील  रिमिक्स मालिकेतही प्रार्थनाने छोटीशी भूमिका करताना प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तिची मायलेक ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेंच्या माध्यमातून तिला बॉलिवुडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यानंतर ती अनेक बॉलिवुड चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. जसे की,  लव्ह यू मिस्टर कलाकार या चित्रपटात ती पहिल्यांदा झळकली.  या  चित्रपटात तिच्यासोबत अमृता राव आणि तुषार कपूर पाहायला मिळाले. तसेच ती बॉडीगार्ड या बॉलिवुडच्या सुपरहीट चित्रपटात झळकली. यामध्ये ती करिना कपूर आणि सलमान खान यांच्यासोबत पाहायला मिळाली. नुकताच तिचा वजह तुम हो हा बॉलिवुड चित्रपट प्रदर्शित झाला. या सर्वामध्ये तिला मराठी मालिका आणि चित्रपटांच्या आॅफर येऊ लागल्या होत्या. फायनली तिचा २०१३ मध्ये वक्रतुंड महाकाय हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले. मात्र तिला मोठा ब्रेक मिळाला तो अवधूत गुप्ते यांचा  जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या चित्रपटातून. यानंतर प्रार्थनाने मागे पाहिलेच नाही. तिने मराठी चित्रपटसृष्टीत एक से एक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. यामध्ये मितवा ,कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस सदाचारी या चित्रपटांचा समावेश आहे.  आता तिचा फुगे हा चित्रपटदेखील प्रदर्शनास सज्ज झाला आहे. या चित्रपटात ती मराठी चित्रपटसृष्टीचे तगडे कलाकार स्वप्नील जोशी आणि सुबोध भावेसोबत झळकणार आहे. तसेच ती मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज कलाकार सचिन पिळगावकर यांच्यासोबतदेखील एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.