अभिनेता प्रसाद ओक नवीन भूमिकेत कधी येणार असा प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांना पडला आहे. प्रसादने नुकतेच महात्मा ज्योतिबा फुले या मालिकेत सशक्त भूमिका साकारली होती. ही मालिका संपून आता काही दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे प्रसादचे चाहते तो कधी पुन्हा दिसणार याची वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर प्रसादला त्याच्या एका चाहत्याने 'या ओ या.... किती वाट पाहायला लावणार' अशी विचारणा केली आहे. यावर प्रसादने येणार..लवकरच अशी त्याला प्रतिक्रिया दिली आहे. प्रसाद परत येतो आहे हे ऐकून त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असणार. परंतू प्रसाद लवकर येणार म्हणजे तो चित्रपट करतोय की मालिका हे मात्र अजुन समजू शकलेले नाही.
प्रसाद नव्या भूमिकेत ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 18:12 IST