Join us  

Dharmaveer Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'धर्मवीर'चं राज्य, तीन दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 4:12 PM

प्रेक्षक मोठ्या संख्येने सिनेमागृहात जाऊन ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा पाहत आहेत.

 समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या धर्मवीर आनंद दिघे (anand dighe) यांच्या जीवनावर ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer mukkam post thane)  चित्रपट आला आहे. त्यामुळेच या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो सातत्याने प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. सिनेमाला रिलीजनंतरही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद थिएटरमध्येही मिळतोय. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा कोट्यवधींची कमाई करत आहे.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (dharmaveer)या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो सातत्याने चर्चेत येत आहे. यात चित्रपटातील अभिनेता प्रसाद ओकच्या (prasad oak) लूकपासून ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होती. त्यामुळे या चित्रपटाला मिळत असलेलं प्रेम पाहून प्रत्येक जण भारावून गेला आहे. 13 मे रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 2.5 कोटींची कमाई करत दमदार सुरुवात केली होती. 

पहिल्या दिवसांत या सिनेमाने  9.59 कोटींची कमाई केली आहे.  प्रेक्षक मोठ्या संख्येने सिनेमागृहात जाऊन ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा पाहत आहेत. चित्रपट तज्ञांच्या मते हा सिनेमा 10 कोटींचा आकडा पार करु शकतो.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' सिनेमा 400 हून अधिक स्क्रिन्स आणि 10 हजाराहून अधिक मोठ्या पडद्यांवर झळकताना पाहायला मिळत आहे. सिनेमात आनंद दिघेंच्या व्यक्तिरेखेला प्रसाद ओकशिवाय अन्य कोणताही अभिनेता न्याय देऊ शकला नसता. खरे वाटावेत असे दिघे प्रसादने सादर केले आहेत.

टॅग्स :प्रसाद ओक सिनेमा