Join us  

फॅशन डिझायनर मारहाण प्रकरणातून प्राजक्ता माळीची निर्दोष सुटका, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 4:10 PM

फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा यांना झालेल्या मारहाणप्रकरणी प्राजक्ता माळीची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा यांना झालेल्या मारहाणप्रकरणी प्राजक्ता माळीची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. सदरच्या तक्रारीत तथ्य नाही आणि न्यायालयीन आदेशात कायदेशीर त्रुटी असल्याचे स्पष्ट करत हा खटला रद्द केला आहे. त्यामुळे या प्रकरणातून प्राजक्ता माळीची सुटका झाली आहे.

ठाणे येथे प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी विरुद्ध जान्हवी अशोक कुमार मंचनदा यांनी खोटी माहिती रचून प्राजक्ता माळीच्या विरुद्ध ठाणे येथे फौजदारी खटला दाखल केला होता, सदर खटल्यात माळी यांना समन्स नसताना, वाॅरंट निघाले असे सांगत त्यांची सर्व प्रकारच्या माध्यमातून बातम्या देऊन बदनामी केली होती. सदर कनिष्ठ न्यायलयाच्या आदेशाच्या विरुद्ध माळी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

सदर न्यालालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून मनचंदा यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे जाणवले आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशात कायदेशीर त्रूटी असल्याचे स्पष्ट केले असून सदर खटला रद्द केला आहे. सदर खटल्यात माळी यांच्या तर्फे अॅड.अभिषेक अवचट व प्रताप परदेशी यांनी कोर्टासमोर बाजू मांडली. सदर खटल्यात माळी यांची जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बदनामीच्या प्रकार बद्दल फिर्यादी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे.

मनचंदा यांनी ५ एप्रिलला काशिमीरा पोलीस ठाण्यात प्राजक्ता माळी हिच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्या तक्रारीनंतर माळी हिच्याविरुद्ध ३२३ आणि ५०४ अंतर्गत एनसी दाखल झाली होती.

तसेच तिने ठोशाबुक्कयांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोपही केला होता. 

टॅग्स :प्राजक्ता माळी