Join us  

'आमचं घर' गेल्या काही दिवसांपासून संकटात आहे, प्राजक्ता माळीने चाहत्यांना मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 12:32 PM

कोरोनाकाळात सोशल मीडियाचा वापर इतरांच्या मदतीसाठीच प्राजक्ता माळी करताना दिसली.अजूनही तिचे मदतकार्य सुरु आहे.आता पुन्हा एकदा प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांकडे मदतीची विनंती केली आहे.

अभिनयासह सेलिब्रिटी मंडळी सध्या स्वतःला समाज कार्यात झोकून देत आहेत. अभिनयाला रसिक जितकी पसंती देतात किंबहुना त्याहून अधिक प्रेम या कलाकार मंडळींना या समाज कार्यातून मिळते. बॉलिवूडच नाही तर कित्येक मराठी कलाकार सामाजिक कार्य करत आहेत. कोरोना काळात याचीही प्रचिती आली. अनेक कलाकार गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. जमेल तशी मदत करण्यासाठी मैदानात उतरला आहे. कोरोनामुळे सारेच बेहाल झाले आहेत. इतर कलाकरांप्रमाणे प्राजक्ता माळीदेखील गेल्या काही महिन्यापासून मदत कार्य करत आहे.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती त्यांच्याशी संवादही साधत असते. कोरोनाकाळातही सोशल मीडियाचा वापर इतरांच्या मदतीसाठीच प्राजक्ता करताना दिसली. अजूनही तिचे मदतकार्य सुरु आहे. आता पुन्हा एकदा प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांकडे मदतीची विनंती केली आहे.

 'आमचं घर' ही एक सामाजिक संस्था आहे, जी ठाण्यात राहणाऱ्या गरीब बांधवांसाठी, मुलांसाठी आणि ज्या वृद्धांना कोणीही आधार नाही त्यांच्यासाठी काम करते. 'आमचं घर' गेल्या काही दिवसांपासून संकटात आहे. कठिण काळात मदतीची गरज आहे. या संस्थेला मदत करण्यासाठी प्राजक्ता माळी पुढे सरसावली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनाया  संस्थेला मदत करण्यासाठी आवाहन तिने केले आहे. 'आमचं घरला मदतीचे हात द्या' असे आवाहन प्राजक्ता माळीने केले आहे. प्राजक्ताचा हा व्हिडीओ पाहून चाहतेही तिला या संस्थेसाठी मदत करणार असल्याचे आश्वासन देत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. मोठ्या मेहनतीने तिने इंडस्ट्रीत स्वःला सिद्ध केले आहे.अभिनयाव्यतिरिक्त ती उत्तम नृत्यांगणाही आहे. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगणा असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळी