प्राजक्ता आणि सिध्दार्थ 'टाफेटा' मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 21:31 IST
मराठी प्रेक्षकांच्या भेटीस नवीन जोडी येत आहे. काय... विचारात पडलात ना.. अहो दुसरे तिसरे कोणी नसून ते तर आपल्या ...
प्राजक्ता आणि सिध्दार्थ 'टाफेटा' मध्ये
मराठी प्रेक्षकांच्या भेटीस नवीन जोडी येत आहे. काय... विचारात पडलात ना.. अहो दुसरे तिसरे कोणी नसून ते तर आपल्या सर्वांचा लाडका चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर व जुळून येतील रेशीमघाटी या मालिकेतील मेघना म्हणजेच प्राजक्ता माळी या दोघांची जोडी आता रूपेरी पडद्यावर धुमाकुळ घालण्यासाठी येत आहे. सचिन व संजय पारेकर दिग्दर्शित 'टाफेटा' या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. नुकताच या सिनेमाच्या शीर्षकाचे अनावरण वर्षा उसगावंकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रेमकथेतून नात्यांचा उलगडत जाणारा अर्थ व त्यातून निर्माण होणाºया भावनिक बंधावर भाष्य करणारा हा चित्रपट असणारआहे. सिध्दार्थ व प्राजक्ता समवेत अभिजीत खांडेकर देखील झळकणार आहे.