'सलमान सोसायटी'मध्ये झळकणार या लोकप्रिय बाल कलाकरांची टोळी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 16:59 IST
मराठी सिनेसृष्टीत विविध विषयांवील दर्जेदार सिनेमांची निर्मिती होत आहे.प्रत्येक सिनेमाचा विषय आणि कथा हटके असते.मराठी सिनेमाची कथा आणि विषय ...
'सलमान सोसायटी'मध्ये झळकणार या लोकप्रिय बाल कलाकरांची टोळी!
मराठी सिनेसृष्टीत विविध विषयांवील दर्जेदार सिनेमांची निर्मिती होत आहे.प्रत्येक सिनेमाचा विषय आणि कथा हटके असते.मराठी सिनेमाची कथा आणि विषय बॉलिवूडलाही भुरळ घालत आहे.मराठी सिनेमांची किर्ती थेट ऑस्करपर्यंत पोहचली आहे.आता मराठीत अशाच एका वेगळ्या विषयावर एक वेगळा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार यांच्या या पहिल्या मराठी सिनेमाचा मुहूर्त अभिनेता सोनू सूदच्या उपस्थितीत पार पडला.'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' अशी टॅगलाइन असलेला हा सिनेमा बाल शिक्षणासारख्या विषयावर भाष्य करणारा असणार आहे.एकूण तीन शेड्युअलमध्ये या सिनेमाचे शूटिंगची तयारी सुरू असून त्याक पहिले शेड्युअलचे शूट पूर्ण झाले आहे.तर दुसऱ्या शेड्युअलचे शूट करण्यासाठी थोडा ब्रेक घेतला होता. सलमान सोसायटीसाठी बाल कलाकारांना ट्रेनिंग देण्यासाठी वर्कशॉप घेण्यात आले आणि चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी सहभाग घेतला. चित्रपटात पुष्कर लोनकर,शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही प्रसिद्ध बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. बाल कलाकार पुष्कर लोनकर ने ह्या आधी 'एलिझाबेथ एकादशी', 'बाजी', 'रांजण', 'चि .व चि .सौ. का', 'फिरकी आणि टी . टी . एम' .एम' चित्रपटात अभिनय केला आहे. तर शुभम मोरे ह्याने हिंदी चित्रपट 'रईस' मध्ये बालपणच्या शाहरूख खान ची भूमिका साकारली असून 'हाफ तिकिट', 'फास्टर फेने' सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने हाफ टिकिट , ताजमहल आणि येरे येरे पावसा मध्ये भूमिका केल्या आहेत. सलमान सोसायटीचे एकूण ३ शेडूल होणार असून चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई , नवी मुंबईच्या जवळील भागात होणार आहे तसेच चित्रपट ह्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मांत्यांचा मानस आहे.या सिनेमात रसिकांना कॉमेडीचा तडकाही अनुभवायला मिळणार आहे.