Join us

​ पूनमने पटकावला हा किताब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 14:48 IST

आजपर्यंत आपण अनेक अभिनेत्री किंवा मॉडेल्सना बरेचसे पुरस्कार किंवा एखादया कॉन्टेस्टचे विजेतेपड दपटावताना पाहिले आहे. परंतू आता चित्रपटसृश्टीमध्ये पडदयामागे ...

आजपर्यंत आपण अनेक अभिनेत्री किंवा मॉडेल्सना बरेचसे पुरस्कार किंवा एखादया कॉन्टेस्टचे विजेतेपड दपटावताना पाहिले आहे. परंतू आता चित्रपटसृश्टीमध्ये पडदयामागे काम करणाºया लोकांमध्ये देखील एक लपलेले टॅलेंट असल्याचे नुकतेच पाहायला मिळाले आहे. नेहमी पडदयामागे राहून आपला चित्रपट कसा चांगला बनवता येईल आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवता येईल याची धडपड नेहमीच निर्माता करीत असतो. असेच एक नाव आहे चित्रपट निर्मिती आणि इंटेरियर डिझायनर पूनम शेंडेचे हॉट मोंड मिसेस इंडिया वर्ल्डवाइड २०१६-१७ हा मानाचा किताब नुकताच पुनमने पटकावला आहे.  मुंबई, दुबई आणि दिल्ली येथे हा संपूर्ण कार्यक्रम तीन टप्प्यांनमध्ये पार पडला. या स्पर्धेमध्ये भारतीय वंशाच्या जगभरातील ५००० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. दिल्ली मध्ये एका शानदार पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांच्या हस्ते पूनमला ह्यहॉट मोंड मिसेस इंडिया वर्ल्डवाइड २०१६-१७ हा  किताब बहाल करण्यात आला. त्यासोबतच पूनमला मिसेस कॉन्फिडेंट म्हणूनही गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी माझ्या मित्र परिवारातील सर्वांनी मला खूप पाठिंबा दिला. माझे पती निलेश, मुलगी, कुटुंबीय, माज्या ट्रेनर रितिका रामत्री यांचे मी विशेष आभार मानते. माज्या आयुष्यातील हा अतिशय आनंददायी क्षण आहे असे म्हणत भविष्यात अभिनय व  सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा पूनमने यावेळी व्यक्त केली.  पूनम शेंडे हिने नुकताच प्रदर्शित झालेल्या जाऊंद्या ना बाळासाहेब तसेच पिंडदान, स्वामी पब्लिक लिमिटेड, मॅटर अशा सिनेमांची निर्मिती केली आहे. इंटेरियर क्षेत्रात सुद्धा पूनम शेंडे हिच्या पूनम शेंडे स्टुडियोने अनेक रेसिडेंशल आणि कमर्शियल प्रोजेक्ट केले आहेत. आता जर पुनम निर्मिती क्षेत्रातून अभिनयाकडे वळली तर आपल्याला जास्त आश्चर्य वाटायला नको.