Join us

पूजा सावंतवर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 17:45 IST

बॉलीवूड असो या मराठी इंडस्ट्री कोणत्याही कलाकारासाठी चाहत्यांचे प्रेम खूप महत्वाचे असते. कारण कलाकारांच्या प्रत्येक अभिनयाचे कौतूक किंवा त्याच्या ...

बॉलीवूड असो या मराठी इंडस्ट्री कोणत्याही कलाकारासाठी चाहत्यांचे प्रेम खूप महत्वाचे असते. कारण कलाकारांच्या प्रत्येक अभिनयाचे कौतूक किंवा त्याच्या अभिनयाची यशाची पावती देण्यासाठी चाहते नेहमीच तयार असतात. शेवटी असे ही म्हटले जाते की, चाहते असतील तर कलाकार आहेत. त्यामुळे चाहत्यांचे प्रेमाचा आदर करणे ही कलाकारांसाठी तितकेच महत्वाचे असते. आता हेच पाहा ना, इन्स्टाग्रामवर प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंतचे फार कमी कालावधीत पाचशे के फ्लालोवर्स झाले आहेत. त्यामुळे पूजा सध्या खूपच आनंदित झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण तिने नुकतेच तिचा एक झक्कास फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्याचबरोबर फार कमी वेळेत इतके प्रेम दिले यासाठी मनापासून आभार मानत असल्याचेदेखील तिने यावेळी तिच्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. तिच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर खूप सुंदर, झक्कास फोटो, आणखी फ्लॉलोवर्स वाढू दे अशा अनेक शुभेच्छा तिला तिच्या चाहत्यांनी सोशलमिडीयावर दिले असल्याचे पाहायला मिळत आहे. पूजाने यापूर्वी दगडी चाळ, चीटर, क्षणभर विश्रांती, वृदांवन, सतरंगी रे, पोस्टर बॉइज असे अनेक मराठी चित्रपट केले आहेत. तसेच तिने अनेक मालिकादेखील केल्या आहेत. अशा पध्दतीने पूजाने मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची जादूची दाखविली आहे. तसेच पूजाचा सध्या लव्ह एक्सप्रेस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता वैभव तत्ववादी झळकणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे हे मात्र नक्की.