Join us

पिंडदान चित्रपटाचे टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 10:58 IST

चित्रपटाच्या टिझरची सुरूवात आज मी माझ्या आजीचं पिंडदान केलं... या वाक्याने सुरुवात झाली आहे. त्यामुळे साहजिकच एक थ्रिलर लव्ह स्टोरी चित्रपटात पाहता येणार आहे.

प्रशांत पाटील दिग्दर्शित पिंडदान या चित्रपटाचे टिझर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. पिंडदान चित्रपटाच्या नावाप्रमाणेच थ्रिलर असल्याचे दिसत आहे. कारण चित्रपटाच्या टिझरची सुरूवात आज मी माझ्या आजीचं पिंडदान केलं... या वाक्याने सुरुवात झाली आहे. त्यामुळे साहजिकच एक थ्रिलर लव्ह स्टोरी चित्रपटात पाहता येणार आहे. एंटरटेनमेंट्स आणि पूनम शेंडे प्रस्तुत, उदय पिक्चर्स निर्मित पिंडदान या चित्रपटाया चित्रपटात सिध्दार्थ चांदेकर, मनवा नाईक प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १७ जूनला प्रदर्शित होणार आहे.