Join us  

ब्लू मोनोकिनीमधील नेहा पेंडसेच्या फोटोनं वाढवलं इंटरनेटचं तापमान, फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 5:22 PM

नेहा पेंडसे (Nehha Pendse)ने नुकताच ब्लू मोनोकिनीमधला एक फोटो शेअर केला. हा मिरर सेल्फी आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. सध्या ती लोकप्रिय मालिका 'भाबीजी घर पर हैं'मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारताना दिसत आहे. नुकताच नेहा पेंडसेने स्वतःचा निळ्या रंगाच्या मोनोकिनीमधला एक फोटो शेअर केला. हा मिरर सेल्फी आहे. फोटोमध्ये नेहा पेंडसेची टोन्ड फिगर चांगली दिसते आहे.

नेहा पेंडसेने ब्लू मोनोकिनीमधला फोटो शेअर करत लिहिले की, "मी तुम्हाला भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही."  नेहा पेंडसेने वजन कमी केले आहे. फोटोमधील अभिनेत्रीच्या टोन्ड बॉडीवरून अंदाज लावला जाऊ शकतो की ती सध्या खूप वर्कआउट करत आहे.

२०२० मध्ये नेहाची 'भाबीजी घर पर हैं' मध्ये अनिता भाभीच्या भूमिकेत सौम्या टंडनच्या जागी वर्णी लागली. ती जानेवारी २०२१ मध्ये मालिकेत सामील झाली. सौम्याने शोचा निरोप घेतला होता. या भूमिकेसाठी निर्मात्यांनी अनेक अभिनेत्रींशी संपर्क साधला असला, तरी अखेर नेहाला फायनल करण्यात आले. डिसेंबर २०२१ मध्ये नेहाने एका मुलाखतीत सांगितले की सौम्या नंतर प्रेक्षकांनी तिचे अपेक्षेप्रमाणे स्वागत केले नाही. पुढे तिचे काम चाहत्यांना आवडू लागले.

टॅग्स :नेहा पेंडसेभाभीजी घर पर है